रायरेश्वरावरील शिवशौर्य शिबीरात बालकांना स्वच्छ चारित्र्याची शपथ

 

पुणे पोलीसनामा ऑनलाईन

शिव विचार जागर अभियान,शिवशाही संघटना, सणसबाबा आश्रम व मराठवाडा जनविकास संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रायरेश्वरावर येथे निवासी चार दिवसीय शिवशौर्य साहसी बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरूण पवार म्हणाले की ‘मुले जरी देवा घरची फुले असली तरी त्यांना लोन्याचा गोळा बनवु नका जेनेकरून ते उन्हात गेलेकी वितळुन जातील,त्यांना अशा साहसी शिबीरांना पाठवुन सह्याद्रीच्या कातळा सारखे ईतके मजबुत बनवा की त्यावर देशाच्या भविष्याचे सुंदर लेने कोरता येईल’. या प्रसंगी ओयासिस काॅन्सिलरचे आंतर्राष्ट्रीय संमोहन तज्ञ डाॅ.राजेंद्र मोरे, मुकुंद मासाळ,उद्योजक शंकर तांबे,राजेश गाटे, नागेश महाराज पवार व जांबुवंत महाराज तुळजापुरकर यांची विशेष उपस्थिती होती.

पारंपारिक भारतीय मैदानी खेळांनी शिबिराला सुरवात करण्यात आली. त्या नंतर स्नान व अल्पोपहार घेवुन शिबीरार्थींना शपथे करीता रायरेश्वर मंदिराकडे प्रस्थान केले . अंगावर शहारे आणणारे गिर्यारोहण करून शिबीरार्थीं रायरेश्वर मंदिरा जवळ पोहचले . तिथे प्रत्येक शिबीरार्थींला रायगडावरील शिव समाधी जवळील पवित्र माती देवुन स्वच्छ चारित्र्याची शपथ देण्यात आली.रात्रीच्या सत्रामध्ये वक्तृत्व व गायन स्पर्धा संपन्न झाल्या. तर शेवटच्या दिवसाचा प्रारंभ शिवकलीन कसरती व लाठीकाठीने झाला. या सत्रामध्ये शिवयौध्दा मर्दानी आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक वऱ्हाडी व शितल वऱ्हाडी यांनी शिबीरार्थींना शिवकालीन शस्त्रांची सखोल माहिती दिली. दुपारच्या सत्रामध्ये राष्ट्रीय शिवकिर्तनकार प्रा.डॉ. गजानन महाराज वाव्हळ यांच्या ‘ संगीत बाल शिवायाणचा ‘ विशेष भाग सादर करण्यात आला . या मध्ये शिवजन्म , स्वराज्य शपथ , अफजलखान वध , शाहिस्ताखान फजीती , आग्रा भेट व राज्याभिषेक सोहळा इत्यादी प्रसंग सादर करण्यात आले . शोभायात्रेने संगीत बाल शिवायाणची सांगता झाली . त्या नंतर शिबीराचा सांगता समारंभ रामायनाचार्य मनोहर बापु महाराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला . त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये , वर्तमानामध्ये अशा शिबीरांची आवश्यकता विषद केली.

या प्रसंगी शिवशाही संघटनेचे संस्थापक अमितदादा थोपटे , प्रदेशाध्यक्ष सचिनदादा मांगडे ,जेष्ठ स्वामीभक्त आण्णा महाराज साबळे , डाॅ. सचिन जगताप, सणसबाबा आश्रम प्रमुख नामदेव महाराज किंद्रे , हनुमंतराव जाधव, प्रतिकदादा वऱ्हाडी इत्यादींची विशेष उपस्थिती लाभली.