परीक्षा केंद्रावर महिलेचा विनयभंग करणाऱ्या पर्यवेक्षकाला अटक

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन

सोलापूर येथील बी.ए. भाग दोन ची परीक्षा देणाऱ्या महीलेचा विनयभंग करणाऱ्या पर्यवेक्षकाला नागरिकांनी मारहाण करीत चांगलीच अद्दल घडवली. याबाबत महिलेने पोलिसात तक्रार दिल्यानंतर या पर्यवेक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापूर येथील राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळेत मुक्त विद्यापीठाच्या बी.ए . भाग दोन ची परीक्षा सुरु होती. यादरम्यान पर्यवेक्षक म्हणून अकबर नदाफ याची ड्युटी होती. परीक्षा केंद्रात उत्तरपत्रिकेवर सही करण्याच्या निमित्ताने परीक्षा देणाऱ्या विद्यर्थिनीसोबत त्याने लगट करण्यास सुरुवात आली हा प्रकार त्या विद्यर्थीनीच्या लक्षात आला. पहिल्यांदा विद्यार्थिनीने पर्यवेक्षक नदाफला विनंती करून तिथून जाण्यास सांगितले. पण सांगूनही जाणूनबुजून नदाफ विद्यर्थिनींशी असभ्य वर्तन करू लागला . पेपर सुटल्यानंतर विद्यर्थिनीने हा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला . त्यानंतर मात्र संतप्त नातेवाईकांनी पर्यवेक्षक अकबर नदाफ याला परीक्षाकेंद्रावर येऊन बेदम मारहाण केली . पीडित विद्यर्थिनीने याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिली . त्यानंतर तातडीने कारवाई करीत सदर बाजार पोलिसांनी आरोपी नदाफला अटक केली .