तापमानवाढीमुळे समुद्र होत आहेत विषारी

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – अभ्यास करणार्‍या संशोधकांनी म्हटले आहे की, बर्फ वितळत असल्याने समुद्राचे तापमान वाढत असून त्यामुळे पाण्यात विषारी शैवालांची संख्याही वाढत आहे. या तापमानवाढीमुळे समुद्र विषारी होत असल्याचं समोर येत आहे. अमेरिकन संशोधकांच्या मते, आर्क्ट्रिक आणि अंटार्क्टिका या दोन्ही ध्रुवीय प्रदेशांचे तापमान वाढत आहे.

आपण जाणतोच की, अमेरिकन संशोधकांच्या मते, आर्क्ट्रिक आणि अंटार्क्टिका या दोन्ही ध्रुवीय प्रदेशांचे तापमान वाढत समोर येताना दिसत आहेत. पूर्व अंटार्क्टिकामधील ग्लेशियर तापमानवाढीमुळे वितळत चालले आहेत. जागतिक तापमानवाढीचा ध्रुवीय प्रदेशांवरील परिणाम ठळकपणे जाणवत असल्याचं दिसत आहे. दरम्यान संशोधकदेखील यामुळे चकित झाल्याचं दिसत आहे.

ब्लॅक गिलिमॉटच्या जोड्यांनी गेल्या वर्षी 225 घरटी बनवली होती; मात्र यावर्षी 85 पक्षीच या बेटावर पोहोचले व 50 माद्यांनी अंडी दिली. यामधून जन्मलेली 25 पिल्लीच जिवंत राहू शकली. या सर्वाचे मूळ कारण आहे तापमानवाढीमुळे बर्फ वितळणे. ब्लॅक गिलिमॉट पक्ष्यावर संशोधन करीत असलेले पक्षीतज्ज्ञ जॉर्ज डिवोकी यांनी म्हटले आहे की, या वर्षामध्ये अनेक बदल दिसून आले आहेत. कारण जागतिक तापमानवाढीचा परिणाम पक्षी आणि सागरी जीवांवरही होत असल्याचं समोर आलं आहे.

1985 मध्ये आर्क्टिकचा सहावा हिस्सा बर्फच होता, तो आता शंभरावा हिस्सा बनला आहे. आक्ट्रिकचा रंग आता सफेदपासून निळा होत चाललेला आहे. महत्त्वाचे म्हणजे आर्क्टिक ध्रुवावर 30 वर्षांमध्ये बर्फाची जाडी 95 टक्क्यांनी कमी झाली असल्याचे समोर आले आहे. उत्तर भागात विषारी शैवालांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी समुद्र विषारी होत चालले असल्याचं निदर्शनास येत आहे. मुख्य म्हणजे त्याचा विपरित परिणाम पक्षी, सस्तन प्राणी आणि मासे यांच्यावर होत आहे.