सासू-सुनेला जातीवाचक शिवीगाळ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मजूरी करण्यासाठी शेतात आल्या नाहीत याचा राग येवून सासू-सुनेला जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना इच्छापूर ता.साक्री गावात घडली आहे.

याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात, साक्री तालुक्यातील इच्छापूर गावातील रहीवासी मिराबाई वसंत वेंदे (५५) यांनी साक्री पोलीसात दिलेल्या फिर्यादत म्हटले आहे की, त्या व त्यांची सून सुरेखाबाई जगदीश वेंदे या दोघी नाना रामा वाघमोडे रा. इच्छापूर यांच्या शेतात मजुरी करण्यासाठी गेल्या नाहीत याचा राग येवून नाना वाघमोडे याने दि. २४ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सासु-सुनेला असभ्य शब्दप्रयोग करुन जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

त्यानूसार नाना वाघमोडे याचे विरुध्द भांदवि कलम ५०९, ५०४, ५०६ सह अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३ (१) (आर), ३ (१) (एस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.