डॉग मायलो वर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन

५ खुन, १७ घरफोड्या आणि २१ चोऱ्यांचा छडा लावण्यात अतिशय महत्वाची भूमिका बजावणाऱ्या श्वान मायलो याचे सोमवारी निधन झाले. आपल्या १० वर्षाच्या सेवाकाळात त्याने रायगड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचे अनेक तुरे खोवले.

रायगड पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर तीन फैरींची अखेरची मानाची सलामी देवुन मायलोवर संपूर्ण शासकीय इतमामात साश्रृनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डाबरमॅन जातीचा श्वान मायलोचा जन्म ४ जून २००८ साली झाला असून अवघ्या दोन महिन्यांचा असताना तो पोलीस दलात दाखल झाला होता. मागील १० वर्षांत एकूण ५९१ प्रकरणात त्याने सहभाग घेतला होता. यात जिल्ह्यातील एकूण ४३ गुन्हे उघडकीस आणले होते. त्यापैकी ५ खून, १७ घरफोडी, २१ चोरी या गुन्ह्यांचा समावेश आहे.

[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’555e5d4f-aa85-11e8-bfe5-2fc6eac721c3′]

पोलीस दलात श्वानांचा काम करण्याचा कालावधी साधारणत: १० वर्षांचा असतो. मायलोस १० वर्ष पूर्ण होऊनही आजारी असल्याने त्यास कामावरून कमी न करता औषधोपचारांसाठी श्वान पथक रायगड येथे ठेवण्यात आले होते. मायलो हा मागील एक ते दीड वर्षापासून आजारी असल्याने त्याच्यावर अलिबाग पशुवैद्यकीय रुग्णाल्यात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. मायलोचा रायगड पोलीस दलात दाखल होण्याचा इतिहास मोठा रोचक आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुख्यालयाच्या परेड मैदानाची वरिष्ठ पोलीस अधिकारी श्वानांची पाहणी करीत होते. हॅन्डलरने दिलेल्या प्रत्येक कमांड वर रायगड पोलीस दलातील श्वान मायलो आपले काम चोख बजावत होता त्यात कसलीही कसुरी दिसून येत नव्हती. परंतु डॉबरमॅन जातीच्या श्वानाकडून वरिष्ठांना अभिप्रेत असणारी आक्रमकता काही दिसून येत नव्हती. अधिकाऱ्यांनी तशी त्यांची खंत डॉगच्या हॅन्डलरकडे बोलून दाखवली. ह्यावर हॅन्डलरने डॉगला एका विशिष्ट वस्तूला गार्ड करण्याची कमांड दिली आणि मैदानातील कुठल्याही व्यक्तीने ती उचलून दाखविण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले त्याप्रमाणे काही जण ती वस्तू उचलण्यास गेले असता  शांत आणि संयमी दिसणाऱ्या श्वान मायलोने आपला पवित्रा क्षणार्धात बदलला आणि आक्रमक रूप धारण केले त्याच्या जबड्यातील त्या दातांच्या सुळक्यांना पाहून समोरचा इसम कितीही धीट असो तो गलितगात्र न झाला म्हणजे नवल. त्याच्या गर्जनानी मैदान दुमदुमुन गेले. त्यावेळी हॅन्डलरने जे सांगितले त्यावरून ह्या श्वानांची  पराकोटीची आज्ञाधारकता दिसून येते हॅन्डलरच्या सांगण्याप्रमाणे जोपर्यंत ती कमांड बदलली जात नाही तोपर्यंत स्वत: हॅन्डलरही ती वस्तू उचलू शकत नाही इतके हे श्वान आपल्या कर्तव्यप्रती प्रामाणिक असतात.

मुख्यमंत्र्यांना धनगर आरक्षण चिघळवायचे आहे : पडळकर