जुन्या संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला : दोन जण जागीच ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्याजवळील जुना संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला. ही घटना पहाटे साडेचार वाजता घडली. त्यात दोघे जागीच ठार झाल्याची शक्यता आहे. ट्रकमध्ये आणखी काही जण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

[amazon_link asins=’B077PWजBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’417c8d11-8c94-11e8-8ca2-1f488adb5bb1′]

कामगार पुतळ्याकडून जुन्या बाजारकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक रेल्वे पुल व जुना संगम पुल यांच्या मधल्या भागात पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळला. या अपघाताची माहिती अग्निशामक दलाला मिळताच ते घटनास्थळी पोहचले. जवानांनी शिड्या लावून नदीपात्रात उतरले. त्यावेळी संपूर्ण काळोख होता. ट्रक कोसळताना पूर्णपणे उलटा झाला असून चाके वर आली आहेत.त्यामुळे ड्रायव्हरच्या केबीनमध्ये अडकलेले पूर्णपणे दबून गेले आहे.

एका बाजूने ट्रकमध्ये एक व्यक्ती दिसत आहे.क्रेनच्या सहाय्याने ट्रक सरळ केल्यानंतरच आत किती लोक आहेत, हे समजू शकणार आहेत. सुरुवातीला क्रेन आली परंतु, ती छोटी असल्याने तिचा काही उपयोग झाला नाही.आता मोठी क्रेन मागविण्यात आली आहे. ट्रक सरळ करण्याचे काम सुरु झाले आहे.

[amazon_link asins=’B0756Z53JP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ea82fa3a-8c98-11e8-bc93-c9ebb66db859′]