स्त्रियांकडे पाहताना मोठा भाऊ नातं देखील विसरायचा, मग लहान भावानं त्याला ‘संपवलं’

वाशिम, पोलीसनामा ऑनलाइन – स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या मोठ्या भावाची लहान भावानेच हत्या केली. ही धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील आहे. यानंतर या लहान भावांला पोलिसांनी अटक केली आहे. 6 डिसेंबरला मोटारसायकलला बांधलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह जिल्ह्याच्या आसेनाव पेनच्या पैनगंगा नदीच्या बाजूला पुलाखाली आढळून आला. या तरुणाचा निर्दयीपणे खून करुन त्याला नदी पात्रात टाकण्यात आले होते. पोलीस तपासात हा मृतदेह संदीप बकाल याचा असल्याचे उघड झाले.

धोडप गावातील संदीप बकाल हा 27 नोव्हेंबरपासून घरातून बेपत्ता होता. तो त्या दिवशी रिठदला आला होता. मात्र, संध्याकाळी त्याचा मोबाईल बंद येत असल्यानं तशी तक्रार रिसोड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली.

संदीप बकाल या 28 वर्षीय तरुणाच्या खुनाचा तपास करणं पोलिसांसमोरील मोठे आव्हान होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. पवनकुमार बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केल्यावर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

पोलीस तपासात उघड झाले की संदीपचा खून त्यांच्याच लहान भावाने आपल्या मावस भावाच्या आणि इतर दोघांच्या मदतीने केला आहे. संदीप बकाल यांच्याकडे कायमच मोठी रक्कम असायची. तो नेहमी कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहत असे. भावाला यातील नातं देखील समजत नसल्याने त्याच्या सख्खा लहान भावाने मोठ्या भावाचे आयुष्य संपवलं. चौघांनी मिळून संदीपचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह मोटार सायकलला बांधून नदी पात्रात फेकून दिला. या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत तसेच चौघांना अटक करण्यात आली आहे. एकाच कुटूंबातील मोठ्या भावाची हत्या झाली तर लहान भाऊ या प्रकरणी तुरुंगात गेला त्यामुळे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/