म्हणून साजरी केली जाते दत्त जयंती 

” ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले ”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –हे जगदीश खेबूडकरांचे गीत घर घरातून अगदी आजही ऐकले जाते. श्री दत्त हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात, राज्यात पुजले जाणारे दैवत आहे. तर दत्ताच्या जन्मातच दत्त जयंतीच्या उत्सवाची बीजे आहेत. दत्ताची महाराष्ट्रात अनेक देवस्थान प्रसिद्ध आहेत. नरसिंहवाडी (कोल्हापूर ), एकमुखी दत्त नारायणपूर  (पुणे ) हि महाराष्ट्रातील दत्ताची प्रमुख प्रसिद्ध देवस्थान आहेत. तर महाराष्ट्रातील माहूर गड हे दत्ताचे जन्मस्थळ मानले जाते.

दत्त जन्माची कहाणी 

अनसूया हि पवित्र प्रतिव्रता होती. तिने आपल्या पतीचे व्रत नित्यनेमाने करून मोठी सिद्धी प्राप्त केली होती. असे म्हणतात अनसूयात एवढे दैवी सामर्थ जगले होते कि तिने ठरवले तर ती कोणाला हि दैवत्व देऊ शकत होती. अशातच हि बाब घेऊन  देवेंद्र ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या कडे गेले. यांच्याकडे  जाऊन इंद्र म्हणाले कि या अनसूयाचे सामर्थ आपणास ठाऊक नाही.ती कोणालाही दैवत्व बहाल करत शकते. यावर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी अनसूयेची परीक्षा घेण्याचे ठरवले

अनसूया आपल्या आश्रमात एकटीच होती. तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश हे भिक्षुकाच्या रूपात आले त्यांनी अनसूयेला भोजनदान करण्यास सांगितले. त्या काळात अनसूयाचा आश्रम हा इच्छित भोजन मिळवण्यासाठी प्रसिद्ध होता. त्या वाटेवरून जाणारे वाटसरू आणि यात्रेकरू ,भिक्षुक जेवणास या आश्रमात येत असत. अनसूया हि त्या लोकांना आनंदाने जेवण जेवायला घालत असत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना जेवण घेऊन येण्यासाठी आपल्या कुटीमध्ये गेली.

अनसूया कुटीतून जेवण घेऊन येताच तिला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी विवस्त्र होऊन जेवण वाढण्यास सांगितले. तेव्हा ती आत गेली तिने आपल्या पतीचे मनोमन स्मरण केले आणि ती आपल्या पतीला मनोमन म्हणाली कि माझ्या घरी येणारा प्रत्येक अतिथी मला माझ्या बाळा समान आहे. म्हणून मी या अथितीला विवस्त्र होऊन जेवण वाढत आहे. अनसूयेने वस्त्र उतरवली आणि ओसरीत बसलेल्या भिक्षुकांना जेवण वाढायला जाणार तेवढ्यात त्या तीन भिक्षुकांचे रूपांतर बाळामध्ये झाले. ती बाळे खूप रडत होती. अनसूयेने त्यांना स्तनपान केले. तेव्हा ती बाळे रडण्याची थांबली.

अनसूयेने त्या बाळांना औदूंबराच्या झाडाला झोका बांधला आणि त्याच क्षणी अनसूयेचे पती अत्रीऋषी त्या ठिकाणी आले त्यांनी उदगार काढले “देवांनी दत्त पाठवले आहेत ” त्या क्षणी त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश प्रकट झाले आणि त्यांनी अनसूयेला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा अनसूयेने पाळण्यातील बाळे हि तिच्यासाठी ठेवण्यात सांगितली या वरासाठी अनुसयेला देव तदस्तु म्हणाले.  या तीन बळापैकी विष्णू झालेले बाळ म्हणजे दत्त , शंकरापासून दुर्वास तर बह्मा पासून चंद्र अशी ती तीन बाळे होती.

त्यातील दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले चंद्र आकाशात निघून गेले तर दत्त पृथ्वीवर दैत्य संहार आणि भक्त रक्षणासाठी राहिले. हि कथा ज्या दिवशी घडली त्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा होती म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी करतात. या दिवशी पंच पकन्नाचे अन्नदान करण्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे.