जो सर्वांना घेऊन पुढे जातो तो ‘म्होरक्या’ ! अमर देवकरसह टीमनं सांगितला सिनेमाचा ‘प्रवास’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑानलाईन – दिग्दर्शक अमर देवकर लिखित दिग्दर्शित म्होरक्या हा मराठी सिनेमा उद्या (शनिवार दि 8 फेब्रुवारी) रिलीज होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलताना दिसली. अखेर उद्या हा सिनेमा आपली ओपनिंग करणार आहे. अमर देवकर प्रेक्षकांसाठी एक नवी कथा घेऊन येत आहे. जो सर्वांना पुढे घेऊन स्वत: पुढे जातो तो म्होरक्या असं सांगणार हा सिनेमा आहे. नेतृत्व काय नसतं हे तर सर्वजण सांगतात. परंतु नेतृत्व काय असतं आणि ते कसं असावं अमर देवकर यांनी सांगितलं आहे.

सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सतत या सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. अमर देवकर यांनी हा सिनेमा सत्यात कसा उतरला, तसेच सिनेमासाठी त्यांनी काय काय केलं असं सर्व काही आपल्या मुलाखतीत सांगितलं आहे. सिनेमातील हिरो रमण देवकर, हिरोईन ऐश्वर्या कांबळे तसेच विलन यशराज कऱ्हाडे यांनीही आपल्याला आलेले अनुभव तसेच ऑडिशनच्यावेळी घडलेले काही किस्से सांगितले आहेत.

काय आहे म्होरक्या ?
म्होरक्या ही एका गरीब कुटुंबातील अशोकची कथा आहे. यात रमण देवकर यानं ही भूमिका साकारली आहे. परिस्थितीमुळे गावात मेंढ्या हाकणारा मुलगा म्हणजे आश्या ज्याला शाळेतील प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं होणाऱ्या परेडचं नेतृत्व करायचं असतं. परंतु गावच्या पाटलाचा मुलगा बाळ्याचा(यशराज कऱ्हाडे) त्याला रोष सहन करावा लागतो. तो दिवसभर मेंढ्या पाळत असतो. परेडचं नेतृत्व करण्यासाठी त्याला नियमित शाळेत येण्याची अट असते.
Mhorkya
अशात त्याला परेडच्या तांत्रिक बाबीही शिकायच्या असतात. गावात कारगिल युद्धात लढलेला आणि गावानं गद्दार घोषित केलेला स्किजोफ्रेनिक अण्णा(अमर देवकर) नावाचा सैनिक असतो. मोठ्या प्रयत्नानं आश्याला अण्णाकडून परेडचं शिक्षण मिळतं. आश्या शेवटी परेडचं म्होरक्यापद मिळवतो. अशी सिनेमाची स्टोरी आहे.

अमर देवकर हे सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक तसेच सहअभिनेते आणि सहनिर्माते आहेत. एका नव्या दमाची कथा खरंच पाहण्यासारखी आहे. तेव्हा उद्या म्होरक्या हा सिनेमा पहायला विसरू नका.