कांदा घसरला ! 9 दिवसातकांद्याचे दर निम्म्यावर

लासलगाव – कोरोनाचा कहर, लॉक डाऊनची परिस्थीती,कांदा पुरवठा अधिक तर मागणीत घट या कारणामुळे कांदा तेराशे रुपयेच्या घरात आला असून सध्या कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. त्यातच परराज्यातील कांदा आता बाजारात यायला सुरुवात झाल्याने महाराष्ट्र राज्यातील मागणीत घट होत आहे त्यामुळे १ मार्चच्या तुलनेत कांदा दर निम्यावर आले आहे.

राजस्थान,गुजराथ, मध्य प्रदेश,कोलकत्ता या राज्यात कांदा आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे महाराष्ट्रीयन कांद्यास मागणी कमी झाली. परिणामी भाव कोसळले आहे. त्यातही मध्यंतरी भाव वाढल्यामुळे शेतकरी कच्चा कांदा विक्रीला आणत आहेत. तसेच लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमावर निर्बंध आहेत. अनेक जिल्हयात वाढता कोरोनामुळे प्रशासनाने निर्बंध कडक केल्याने हॉटेलमध्ये गर्दी कमी झाली असुन कांद्याला मागणीत घट झाली आहे.

येथील मुख्य बाजार आवरावर लाल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये,सरासरी १३५१ तर जास्तीत जास्त १४३० तर उन्हाळ कांद्याला कांद्याला कमीत कमी ९०० रुपये,सरासरी १२५० तर जास्तीत जास्त १३७२ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.