home page top 1

एकमेव अभिनेता ज्याचं ‘तारूण्य’ वयाच्या 62 व्या वर्षी देखील ‘कायम’, आता देखील धावतो ‘सुपरफास्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा एक असा 62 वर्षीय अभिनेता आहे ज्याला आपलं वय लपवण्याची गरज पडत नाही. कारण तो नैसर्गिकपणे आजही तेवढाच यंग दिसतो. आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत तो बॉलिवूडमधील डॅशिंग आणि स्टायलिश स्टार अनिल कपूर आहे. अनिल कपूर आजही म्हातारा दिसत नाही.

अनिल कपूरच्या यंग दिसण्यामुळे अनेकदा इव्हेंटमध्येही त्याची थट्टा केली जाते. असं म्हटलं जातं की, अनिलला काहीतरी रहस्यमय जडी बुटी मिळाली आहे ज्याच्या सेवनाने तो म्हातारा होत नाही. परंतु त्याच्या तंदुरुस्तीचे रहस्य म्हणजे त्याची आळसापासून दूर असलेली लाईफस्टाईल आहे. नुकताच अनिल कपूरने करवाचौथच्या निमित्ताने इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तो खूपच वेगाने धावताना दिसत आहे.

आपल्यातील उत्साहाचे कारण पत्नी सुनीता कपूर असल्याचे सांगत अनिल कपूरने लिहिलं, “तुझं प्रेम, प्रार्थना आणि व्रत ठेवणं मला वेगाने धावण्याची शक्ती देत आहे. आणि यामुळे मी नेहमीच निरोगी राहतो सुनीता.”

सुनीता कपूरनेही यावर 3 किसवाल्या इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. बॉलिवूडमधील इतर कलाकारही अनिलची रनिंग पाहून चकित झाले. अनेकांनी प्रतिक्रिया देत अनिल कपूरची स्तुती केली आहे.

अनिलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर अनिल लवकरच पागलपंती या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात जॉन अब्राहम, इलियाना डिक्रूज, अरशद, पुलकित सम्राट प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 22 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

A post shared by Sunita Kapoor (@kapoor.sunita) on

Visit : policenama.com

Loading...
You might also like