‘विक्रम’ लँडरशी फक्त संपर्क तुटला, मोहीम सुरुच

श्रीहरिकोटा : वृत्त संस्था – इस्त्रोच्या चांद्रयान २ मधील विक्रम लँडरशी संपर्क तुटला आहे.  ऑर्बिटर उत्तम काम करीत असून त्याच्याशी संपर्क सुरु आहे. त्यामुळे विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. कदाचित विक्रम लँडर हा त्याला नेमून दिलेले काम करतही असेल, असे इस्त्रोच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

ऑर्बिटरपासून वेगळे झाल्यानंतर चंद्राभोवती फिरत होते. त्याचे लँडिंग सुरु असताना केवळ २.१ किमी अंतर राहिले असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला आहे. त्यामुळे त्याचे पुढे काय झाले. त्याने व्यवस्थित लँड केले की नाही हे समजू शकलेले नाही. मात्र, त्याचवेळी ऑर्बिटरशी संपर्क सुरु आहे.  ऑर्बिटरने काढलेली छायाचित्रे मिळण्याची शक्यता आहे.

संपर्क तुटण्यापूर्वी विक्रम लँडरने काढलेली छायाचित्रेही मिळण्याची शक्यता आहे.  ऑर्बिटरकडून विक्रम लँडरवर लक्ष ठेवण्यात येत होते. त्याने पाठविलेल्या संदेशावरुन शास्त्रज्ञांना विक्रम लँडरविषयी माहिती मिळण्याची शक्यता आहे. विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न इस्त्रोने सोडून दिलेला नाही. त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अजूनही सुरु आहे.