पाच कोटी कमविण्याची संधी

नई दिल्ली

बेनामी संपत्तीविरोधात आता केंद्र सरकारने गंभीर पावले उचलण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून निनावी संपत्तीची माहिती देणाऱ्यास एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची योजना सुरु केली आहे़ परदेशातील संपत्तीची माहिती दिल्यास त्यांना पाच कोटी रुपये बक्षीस मिळू शकतात़ आयकर विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, एखाद्या व्यक्तीने निनावी प्रतिबंधक युनिटमध्ये जाऊन सहआयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांसमोर निनावी संपत्तीबाबत माहिती दिली तर त्याला हे इनाम मिळेल.

अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार, अशा संपत्तीची माहिती आयकर विभागाच्या तपास संचालनालयाला द्यावी लागेल. यानंतर संबंधित व्यक्तीला विभागाकडून पाच कोटीपर्यंतचं इनाम दिलं जाईल. निनावी व्यवहार माहिती इनाम योजना, २०१८अंतर्गत हे बक्षीस माहिती देणाºयाला देण्यात येईल.

सरकारने नुकतेच १९८८  च्या निनावी कायद्यात सुधारणा करुन निनावी व्यवहार कायदा, २०१६ मंजूर केला आहे. निनावी संपत्तीच्या शोधासाठी सामान्य नागरिकांचे सहकार्य वाढवण्यासाठी सरकारने या इनामी योजनेची घोषणा केली आहे. निनावी व्यवहार आणि संपत्ती उजेडात आणल्याने तसेच अशा संपत्तीमधून मिळणाºया उत्पन्नाची माहिती देणाºयांना हे बक्षीस मिळेल.

या योजनेचा लाभ परदेशी नागरिकही घेऊ शकतात. निनावी संपत्तीची माहिती देणाºया व्यक्ती ओळख गुप्त ठेवली जाईल आणि संपूर्ण प्रकरणात गोपनीयताही बाळगण्यात येईल. निनावी व्यवहार माहिती इनाम योजना, २०१८ बाबत आयकर विभागाची कार्यालये आणि वेबसाईटवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे, असं मंत्रालयाने सांगितलं आहे.

करचोरीची माहिती दिल्यास ५० लाख मिळणारइतकंच नाही तर सरकारने करचोरीची प्रकरण उजेडात आणण्यासाठीही ५० लाख रुपयांच्या बक्षीसाची योजना जाहीर केली आहे. १९६१ च्या आयकर कायद्याअंतर्गत सरकारने आयकर माहिती इनाम योजना सुरु केली आहे. याअंतर्गत जर कोणी करचोरीच्या प्रकरणाची माहिती आयकर विभागाच्या तपास संचालनालयाला दिली तर तो या इनामासाठी पात्र असेल.

तेव्हा आता काळा पैसा बाहेर काढण्यात मदत केलेल्याचे देशकार्य करुन मालामाल होण्याची संधी सरकारने दिली आहे़