मराठा आंदोलनाचा उद्रेक… कुठे पेटवल्या पोलिसांच्या गाड्या, तर कुठे पोलिसांवर दगडफेक

मुंबई: पाेलीसनामा ऑनलाईन

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी सायन-पनवेल हायवेवर कळंबोलीजवळ पोलिसांच्या दोन गाड्या पेटवल्या. तर साताऱ्यात आंदोलकांनी तुफान दगडफेक केली यामध्ये साताऱ्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत. यावेळी आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी टियर गॅसच्या नळकांड्या देखील पोलिसांना फोडाव्या लागल्या.
[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eb8c680a-8fff-11e8-9360-83fe8fcbac07′]

तर सायन-पनवेल हायवेवर आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांना आग लावल्यामुळे, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या संपूर्ण आंदोलनामुळे मुंबई- पुणे महामार्ग दोन्ही बाजूने बंद झाला आहे. तसेच मुंबईतल्या मुलुंड परिसरात मराठा मोर्चा आंदोलकांनी गाडीच्या टायरची जाळपोळ केली. त्यावेळी मुंबई पोलिसांनी टायरपासून आंदोलकांना बाजूला सारत जळालेले टायर विझवण्याचे प्रयत्न केले. ठाण्यात माजीवाडा ब्रिजजवळही गाड्यांचे टायर जाळले आहेत.

पहा राज्यात या ठिकाणी आंदोलनादरम्यान झाली जाळपोळः
अहमदनगरः
नगर जिल्ह्यातील कर्जत येथे आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी वन विभागाची जिप पेटवली.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f17db577-8fff-11e8-951a-c1cc87cbf9c2′]

मानखुर्द: मानखुर्दजवळ आंदोलकांनी बेस्टच्या बसची तोडफोड केली आणि त्य़ानंतर बस पेटवली. अग्निशमन दलानं वेळीच घटनास्थळी दाखल होत बसची आग विझवली.

बीड: गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर आणि ऑफिसवर आंदोलनकांनी दगडफेक केली.

नाशिक: नाशिकरोड परिसरात आंदोलनाला हिंसक वळण. अनेक दुकानांसह एटीएमची तोड़फोड़ केली.

बारामती: संतप्त मराठा समाजाच्या तरुणांनी रस्ता रोको करत टायर जाळले, तर मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. तर तिकडे इंदापूरमध्ये ठिय्या आंदोलन, सुरवड गावी एस टी बस फोडली.