जखमी मोराची व्यथा आणि ‘लांडोर’ची प्रेम कथा, निफाड तालुक्यातील साताळी येथील घटना

लासलगाव  – पावसाळा सुरू झाली की वेध लागतात पिसारा फुलविलेल्या मोराला पाहण्यासाठी, पिसारा फुलवलेला मोर बघितल्यानंतर त्याच्या अदा पाहून मन हरपून जात चटकन शाळेत शिकविलेले गाणे तोंडात येते नाच रे मोरा आंब्याच्या वनात ,नाच रे मोरा नाच …. सध्या निफाड तालुक्यातील सावळी येथील अश्याच एका मोराची व्यथा व लांडूरची प्रेम कथा आयकून थक्क व्हाल…

निफाड -सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले निफाड तालुक्यातील शेवटचे गाव सावळी आहे या गावात मोठया संख्येने मोरांचा मुक्त संचार आहे सायखेडा-सिन्नर रस्त्यालगत एका शेतात मोराचा उडत असताना झाडाच्या फांदीत पाय अडकला फांदीतून मोर स्वतःची सुटका करत असताना मोराचा पाय मांडीमध्ये मोडला मोराला उडता येईन त्यामुळे मोर जागेवरच पडून होता त्या मोराबरोबर लांडुर होती ती मोराच्या भावती फिरून उडण्याचं मोराला बळ देत होती पण बिचाऱ्या मोराला वेदना होत असल्याने सांगू कोणाला आणि बोलू कोणाला असे या मोराला झाले होते.

त्याच वेळी रस्त्याने जात असताना हा सर्व प्रकार सावळी गावातील संजीव गिरीगोसावी या पक्षीमित्राने बघितले जखमी झालेल्या मोराला घरी आणून अन्न, पाणी दिले वनविभागाला सर्व माहिती देत नाशिक येथे नेऊन पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे नेत तपासणी केली असतात मोराची पायाची मांडी मोडल्याने पायाला प्लास्टर केले आहे निफाड येथील वनविभागाच्या ताब्यात दिले आहे आता मोराची प्रकृती चांगली होत आहे मोराला अधिवासात सोडून लवकर मोर आणि लांडूरचा मिलाप करणार असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी यांनी सांगितले

प्रतिक्रिया- संजय भंडारी (वन परिक्षेत्र अधिकारी, येवला )

मोर जखमी अवस्थेत असतांना पक्षीमित्र संजीव गिरी यांनी मोरावर अन्न पाणी देत घरगुती औषध उपचार केले यासाठी एक रात्रभर जखमी मोर घरात ठेवले होते या मोराच्या पाठीमागे लांडुर आली आहे मोराला शोधण्यासाठी त्याच्या प्रेमात व्याकुळ लांडुर घरावर ,अंगणात आवाज देत फेरफटका मारत आहे

प्रतिक्रिया :- 02 संजीव गिरीगोसावी (पक्षिमित्र)

उपचारानंतर जखमी मोराची प्रकृतीची काळजी निफाड येथील रोपवाटिकेत वनकर्मचारी यांच्या देखरेखीखाली घेतली जात असून लवकरच मोर बरा झाल्याननंतर लांडुरासोबत अधिवासात एकत्र सोडले जाणार आहे तोपर्यंत मोराच्या प्रेमात व्याकुळ असलेल्या लांडुरला काही दिवस मोराला बरे होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे