‘पंचगंगा’ प्रदुषण मुक्तीसाठी चक्क नदीपात्रात उभे राहून आंदोलन

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन

कोल्हापुरातील पंचगंगा नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. या नदी प्रदूषण प्रश्नी रुकडी ग्रामस्थानी नदीपात्रात उतरून अनोखे आंदोलन केले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात पुरुष महिला आणि मुलांचाही लक्षणीय सहभाग होता. नदीत उभारून हे आंदोलन अरण्यात आले.

यावेळी हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावातील पंचगंगा नदीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ पाण्यात उतरले आम्हाला पिण्यासाठी शुद्ध पाणी द्या … पंचगंगा प्रदूषण मुक्त करा अशा घोषणा करीत ग्रामस्थानी आंदोलन केले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान रुकडी ग्रामस्थाना बऱ्याच दिवसांपासून अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. तसेच पाणीपुरवठा नियमित केला जात नाही त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी चक्क नदीत उभेराहून आंदोलन केले .