‘या’ 4 राज्यातील लोक सर्वात जास्त ‘दारू’ पितात, पहिले नाव जाणून विश्वासच बसणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रम, व्हिस्की, चुलैय्या, महुआ, ब्रँडी, जीन, बियर, हडीया, इत्यादी सर्व एकच आहेत कारण या सर्वामध्ये अल्कोहोल असते. होय, यामध्ये अल्कोहोलची मात्रा आणि नशेची अपेक्षीत क्षमता वेगवेगळी जरूर असते, परंतु या सर्व प्रकारांना आपण दारूच म्हणतो. कधी-कधी हडीया किंवा बियरला लोक वेगळे समजतात, जे एकदम चुकीचे आहे. दोन्हीमध्ये अल्कोहोल तर असतेच.

सध्या भारतात दारूची विक्री सर्वात जास्त वेगाने वाढत आहे. जे भारतीयांच्या आरोग्यासाठी खुपच हानिकारक आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे एआयआयएमएसच्या सहकार्याने करण्यात आलेल्या एका सर्वेनुसार, दरडोई खप आणि उपभोगानुसार पंजाब, गोवा, त्रिपुरा, छत्तीसगढ़, अरुणाचल प्रदेशमध्ये दारूचा वापर सर्वात जास्त होतो. ही राज्ये दारूच्या वापराच्या बाबतीत वरच्या स्थानी आहेत. तर सर्वात जास्त पिणार्‍यांच्या संख्येमध्ये उत्तर प्रदेशने बाजी मारली आहे.

सर्वात जास्त दारू पितात या टॉप 4 राज्यातील लोक –

1 तमिळनाडु, सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे केलेल्या सर्वेनुसार दारू पिण्याच्या बाबतीत तमिळनाडुचे लोक टॉपवर आहेत.

2 हरियाणाचा या यादीत दुसरा नंबर आहे. येथील लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन करतात.

3 दारूच्या सेवनात महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर आहे.

4 उत्तर प्रदेशात सर्वात जास्त दारू पिणार्‍या लोकांची संख्या आहे. या यादीत युपीचे चौथे स्थान आहे.