WHO दावा : ‘कोरोना’च्या नावाखाली दिवसभर सुस्त राहणार्‍या लोकांना मोठया आजाराचा धोका

पोलिसनामा ऑनलाइन – आपण कोरोनाचा दुष्परिणाम आजही अनुभवतो आहोत. गेल्या एका वर्षात कोरोनाने लोकांची संपूर्ण जीवनशैली बदलली. लोक घरात अधिक प्रमाणा राहू लागले आहेत, बहुतेक लोक बाहेर कामासाठी न जाता आरामदायक जीवन जगू पाहत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचा असा दावा आहे की जर लोक कोरोना कालावधीत शारीरिक हालचालींवर जोर देत असतील तर वर्षाकाठी जवळपास पाच दशलक्ष मृत्यू टाळू शकतील.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, एखाद्या प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून १५०/२०० मिनिटे शारिरीक, मॅन्युअल श्रम करणे आवश्यक आहे, अन्यथा जगाचे भविष्य सुरक्षित नाही. बर्‍याच मृत्यूंसाठी सामान्य आजार सुध्दा कारण असू शकतात.

चार पैकी एक प्रौढ कसरत करत नाही
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीनुसार, जगातील ४ पैकी १ प्रौढ माणूस कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल करत नाहीत, तर वडीलधाऱ्यांपैकी ५ पैकी ४ लोकांना मोठ्या शारीरिक क्रियेत रस नसतो. जे शारीरिक दुर्बलतेने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी दररोज सुमारे एक तास शारीरिक व्यायाम होणे फार महत्वाचे आहे. हे रोग शारिरीक श्रम न केल्यामुळे होतात.

जे लोक दिवसभर बसतात, आवश्यक असतानाच उठतात किंवा दिवसभर विश्रांती घेतात, मग ते कितीही वय असले तरी त्यांना मधुमेह, कर्करोग, हृदयरोग, तणाव इत्यादींचा धोका असतो. कोरोनामुळे विना धावपळीची जीवनशैली बर्‍याच लोकांनी स्वीकारली आहे. तर तणाव ही एक सरसकट समस्या बनली आहे, जी नंतर एका मोठ्या आजारातही बदलते,असे भारतीय डॉक्टर म्हणतात.

जागतिक आरोग्य संघटनेची मते लक्षात घेऊन भारतीय चिकित्सकांनी या मार्गदर्शक सूचनांचे स्वागत केले आहे, परंतु ते म्हणतात की कोरोना दरम्यान दररोज ५०/६० मिनिटे शारिरीक व्यायाम किंवा अन्य क्रिया करणे भारतीयांसाठी महत्वाचे आहे. कारण आजकाल भारतात मधुमेह आणि नैराश्याची समस्या शिखरावर आहे. हजारो लोक रुग्ण बनून कोरोनाशी झुंज देत आहेतच, पण या आजारांमध्ये वाढ होणे चांगले लक्षण नाही. प्रत्येकजण आता जागरूक होणे आवश्यक आहे.

युवक आणि ज्या लोकांमध्ये कोणतीही समस्या नाही, ते सर्व प्रकारच्या शारीरिक क्रिया करू शकतात. मग ती कसरत, खेळ किंवा कोणतेही नृत्य प्रकार असो, परंतु ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी फिरणे, बागकाम, योग इत्यादीचा अवलंब केला पाहिजे. वृद्धांनी त्यांच्या क्षमतेनुसार मॅन्युअल, शारिरीक श्रम देखील केले पाहिजेत, परंतु निश्चितपणे केले पाहिजेत. सायकलिंग, धावणे इत्यादी देखील आरोग्यासाठी चांगले पर्याय आहेत.

You might also like