भुशी डॅम मध्ये सेल्फी काढताना तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन

लोणावळ्याच्या भुशी डॅम येथे रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पाण्यात उतरून सेल्फी काढणाऱ्या तरुणाचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला आहे.पाण्यात तीन तरुण सेल्फी काढण्यास गेले परंतु त्यातील एक तरुण गाळात रुतला,आणि पोहता येत असताना तो पाण्यात बुडाला,सायंकाळी सात च्या सुमारास बुडालेल्या तरुणाचा मृतदेह मिळाला असून अधिक तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.

तिरूपती राजाराम उलवाड वय २५ रा.संगूचीवाडी ता.कंदार,जि.नांदेड अस पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत तिरुपती राजाराम उलवाड हा त्याच्या पत्नी समवेत पिंपरी-चिंचवड मधील काळेवाडी येथे राहतो,खासगी कंपनीत काम करून तो आपला संसार चालवत होता.दीड वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता,मयत तिरुपतीची पत्नी काही दिवसांसाठी गावी गेली होती.त्यामुळे घरात तो एकटाच होता.मजा मस्ती करण्यासाठी तो सहा मित्रांसमवेत लोणावळ्याच्या भुशी डॅम येथे गेला,मजा मस्ती सुरू होती.सहा मधील तिघांना पोहता येत नसल्याने ते बाहेर थांबले. तिरुपती आणि त्याचे मित्र पाण्यात उतरत पोहत असताना त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.अधिक खोल पाण्यात जात असताना तिरुपती गाळात रुतला त्याची हालचाल होत नव्हती,मित्रांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केले मात्र पोहत येत असताना पाण्यात बुडाला यात त्याचा मृत्यू झाला ही घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
लोणावळा शहर पोलिसांनी स्थानिक पोलिस मित्रांच्या मदतीने मृतदेह सातच्या सुमारास बाहेर काढला.घटनास्थळी पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील,साह्ययक पोलीस निरीक्षक रांगाट हे देखील होते.