अरेच्या…. पोलिस आयुक्‍तांच्या कार्यालयातील फोनचे आऊट गोइंग बंद अन् खोळंबा

पिंपरी ः पोलीसनामा ऑनलाईन

 

पिंपरीचे पोलिस आयुक्‍त आर.के. पद्मनाभन यांच्या कार्यालयातील फोनचे आऊट गोइंग बंद झाले आहे. दि. 15 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयातील बहुसंख्य पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. मात्र, चक्‍क पोलिस आयुक्‍तांच्या कार्यालयाच्या फोनचे आऊट गोइंग बंद झाल्याचे चांगलीच तारांबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B071CY6D29′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b7fdcac0-cd2f-11e8-858e-1de4efbc56a9′]
दोनच दिवसांपुर्वी पिंपरी पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीतील चिखली पोलिस ठाण्याचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी आयुक्‍तालयातील मनुष्यबळ आणि वाहनांचा प्रश्‍न लवकरच सोडविणार असल्याचे आश्‍वासन दिले. पण आज (गुरूवार) चक्‍क पोलिस आयुक्‍त कार्यालयातील फोनच आऊट गोइंग बंद झाल्याने पोलिस वर्तुळामध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे. पिंपरी आयुक्‍तालयात अनेक गोष्टींची कमतरता असल्याचे आयुक्‍त कार्यालयातील संबंधितांनी पोलिस महासंचालक कार्यालयास कळविले आहे. मात्र, पोलिस महासंचालक कार्यालयाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. एकीकडे पिंपरी आणि परिसरातील गुन्हेगारीने डोके वर काढले आहे आणि दुसरीकडे पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना मुलभुत सुविधा मिळत नसल्याचे पोलिस कसे काम करणार हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पोलिस आयुक्‍त कार्यालयात 020 (27450555) हा लॅन्डलाईन क्रमांक कार्यान्वीत आहे. त्याचे सुमारे 2 हजार हून अधिक बील आलेले आहे. ते वेळेत भरले न गेल्यामुळे त्या फोनचे आऊट गोइंग बंद झाले आहे. पोलिस आयुक्‍तांसह इतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी पिंपरी पोलिस आयुक्‍तालयातील समस्याचा पाढा संबंधितांकडे वाचला आहे. मात्र, त्याचा काडीमात्र उपयोग झालेला नाही. आयुक्‍तालय निर्माण होऊन एवढे दिवस झाले तरी आयुक्‍तालयात मुलभुत सुविधांचा वणवा आहे. चिखली पोलिस ठाण्याच्या उदघाटनाच्या वेळी सर्वच उपस्थित पदाधिकार्‍यांनी अडीअडचणी सोडविण्यास प्राधान्य देण्याचे आश्‍वासन दिलेले आहे.

बील न भरल्यामुळे थेट पोलिस आयुक्‍त कार्यालयातील फोनचे आऊट गोइंग बंद झाल्याची ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. अप्पर पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍याच्या कार्यालयातील फोनचे आऊट गोइंग बील न भरल्यामुळे बंद झाल्याने नाचक्‍की होत आहे.