भाजपा सोशल मीडिया टीम कडून मोठी चूक , हळदीचे उत्पन्न दाखवताना लावला चक्क नारळाचा फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नेटीझन्सने सोशल मीडियावर भाजपाला चांगलेच ट्रोल केले आहे . भाजपा सोशल मीडिया टीमकडून ‘सलाम शेतकऱ्यांच्या जिद्दीला’ या कॅप्शनने एका फोटो पोस्ट करण्यात आला आहे . मात्र, या फोटोवर हळदीचे पीक घेतल्याचे सांगत, चक्क नाराळाच्या रोपांचा फोटो लावण्यात आला आहेत.

भाजपा सोशल मीडियाद्वारे स्वतःचा प्रचार करतच असते . अशाच प्रकारे लोहा तालुक्यातील एका शेतकऱ्याने अत्यल्प पाण्यावर हळदीचे पीक घेतल आहे . हेच सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपाने सोशल मीडिया टीमचा वापर केला , मात्र सोशल मीडिया टीम कडून मोठी चूक झाल्याचे दिसून आले आहे. नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी लोहा (जिल्हा नांदेड) गावात सपाट जमीन आहे . मात्र , तिथे त्यांनी निसर्गरम्य हिरवेगार डोंगर दाखवले आहेत . तर , हळदीचे विक्रमी उत्पन्न सांगताना , चक्क नाराळाची पिके वापरली आहेत. त्याठिकाणीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसून येत असून देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र असा लोगोही या फोटोवर दिसत आहे . त्यांच्या या चुकी मुळे नेटीझन्सने सोशल मीडियावर भाजपाला चांगलेच ट्रोल केले आहे.

विशेष म्हणजे, भाजपा सोशल मीडिया टीमला काही वेळातच आपली चूक लक्षात येता, हा फोटो फेसबुक पेजवरुन हटवण्यात आला, आणि त्याऐवजी नवीन एडिटेड फोटो वापरण्यात आला आहे. मात्र, नेटीझन्सने स्क्रीनशॉट काढून नारळाच्या रोपांचा तो जुनाच फोटो व्हायरल केला आहे. त्यामुळे अजूनही नेटीझन्सने सोशल मीडियावर भाजपा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर विनोद करत आहेत.