फोटोग्राफर म्हणाला – ‘भाग्यश्रीला पकडून स्मूच कर’, ‘भाईजान’ सलमाननं दिलं ‘असं’ उत्तर, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार भाग्यश्री हिनं सलमान खानच्या मैने प्यार किया सिनेमातून डेब्यू केला होता. 1989 मध्ये आलेल्या या पहिल्याच सिनेमातून तिनं लोकांच्या मनात घर केलं. हा सिनेमा आला आणि भाग्यश्री रातोरात स्टार झाली. त्यांची केमिस्ट्री पाहून सलमान आणि भाग्यश्रीला फोटोशुटच्या अनके ऑफर येऊ लागल्या. याच फोटोशुटबद्दल आता भाग्यश्रीनं काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना भाग्यश्री म्हणाली की, “त्या काळी एक फेमस फोटोग्राफर होते जे आज या जगात नाहीत. त्यांना सलमानचे आणि माझे काही हॉट फोटो हवे होते. फोटोशुट करताना त्यांनी सलमानला कोपऱ्यात घेतलं आणि ते म्हणाले, मी जेव्हा कॅमेरा सेटअप करेन तेव्हा तू भाग्यश्रीला पकडून स्मूच कर.”

भाग्यश्री पुढे म्हणाली, “सलमान आणि त्या फोटोग्राफरला याचा अंदाज नव्हता की, मी शेजारीच उभी आहे आणि सर्व ऐकत आहे. काही सेकंदासाठी मी स्तब्ध झाले. यानंतर मी सलमानचा रिप्लाय ऐकला. सलमान फोटोग्राफरला म्हणाला, मी असं काहीही करणार नाही. जर तुम्हाला अशी काही पोज हवी असेल तर तुम्हाला भाग्यश्रीसोबत बोलावं लागेल.”

भाग्यश्री असंही म्हणाली, “त्यावेळी आम्ही न्यू कमर्स होतो. फोटोग्राफरला वाटलं की, त्याला हवं तसं तो आम्हाला वापरू शकतो. त्या काळात स्क्रीनवर स्मुचिंग सीन दाखवत नव्हते. सलमानचा रिप्लाय ऐकल्यानंतर माझ्या जीवात जीव आला की मी सुरक्षित वातावरणात काम करत आहे.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like