पतंग उडवण्याचा आनंद ठरतोय वाहनधारकांसाठी जीवघेणा, मांजामुळे तरुणी जखमी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

पतंग उडवण्याचा आनंद वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एका डॉक्टर तरुणीला मांजामुळे जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच कोल्हापूरमध्ये एका कॉलेज तरुणीच्या चेहऱ्याला मांजा गुंडाळला गेल्याने चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. सुदैवाने ही कॉलेज तरुणी बचावली. ही घटना सोमवारी (दि.७) देवकर पाणंद येथे घडली असून यामध्ये ऐश्वर्य़ा उदय निंबाळकर (वय-१९) ही माहाविद्यालयीन तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’accea51a-cbab-11e8-8360-6389d3d5c6cf’]

पतंग उडवण्यासाठी सर्रास चायनीज मांजाचा वापर केला जातो. बेकायदेशीर विकल्या जाणाऱ्या ह्या नायलोनच्या मांजामुळे अनेक पक्षी तर गतप्राण झालेच आहेत, मात्र मांजा गळ्याभोवती गुंडाळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऐश्वर्य़ा निंबळकर ज्या मांजामुळे जखमी झाली त्याच मांजामुळे अन्य चौघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामुळे चायनीज मांजाला बंदी असतानाही त्याची छुपी विक्री होत असल्याचे या घटनेनंतर उघड झाले आहे.

कमी पैशांत न तुटणाऱ्या चायनीज मांजाची सध्या क्रेझ आहे.

तो पतंग उडवणाऱ्यांना आनंद देत असला तरी तो वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे. कमी जाडीचा मांजा डोळ्याला दिसत नाही. परिणामी मुख्य रस्त्यावरून जाताना वाहनधारक मांजा कापून ते जखमी होत आहेत. रविवारी ऐश्वर्या आपली आई उमा यांच्यासह मोपेडवरून जात होती. देवकर पाणंद येथे आल्यानंतर अचानक तिला चेहऱ्यावर काही तरी कापल्याचे जाणवले. तिने तत्काळ मोपेड थांबवली. मात्र, तोपर्यंत ती रक्तबंबाळ झाली होती. काही क्षणातच ती बेशुद्ध पडली.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b1a4979f-cbab-11e8-ac82-c5190026277b’]

परिसरातील लोक मदतीला धावून आले; तेव्हा चायनीज मांजा कापल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी ऐश्वर्याला रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्या डोळ्यासह गळ्याला १२ टाके पडले आहेत. केवळ दैव बलवत्तर म्हणून ऐश्वर्याचे डोळे व जीव बचावला. गेल्या आठवड्यातच गजेंद्र नरदेकर या वडणगेतील तरुणाला पोवार पाणंद येथे चायनीज मांजा कापला होता. आठवडाभरात शहर परिसरात घडलेल्या या दोन घटनांनी चायनीज मांजाचे धोके अधोरेखित झाले आहेत.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bf60fab6-cbab-11e8-ae62-d305db62f8e9′]

बेकायदेशीर विकल्या जाणाऱ्या ह्या नायलोनच्या मांजामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात देखील काहींनी आपले प्राण गमावले आहेत. कृपाली निकम या महिला डॉक्टरचा दोन दिवसांपूर्वी मांजामुळे मृत्यू झाला. या आधीही पुण्यातील सुवर्णा मुजूमदार ह्या महिलेचा अश्याच घटनेत मृत्यु झाला होता. तर पिंपरी चिंचवड मधील हमजा खान नावाच्या चार वर्षीय मुलाच्या डोळ्यावर आणि पासष्ट वर्षीय जेष्ठ नागरिकांच्या गळ्यावर ह्याच मांज्यामुळे खोल इजा होऊन दोघीही गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतरही बंदी असलेल्या नायलॉन मांजाची अजुनही सर्रास विक्री सुरु आहे त्यामुळे अश्या किती घटना आणि किती बळी गेल्या नंतर प्रशासन जागे होणार हा खरा प्रश्न आहे.