बहुचर्चित बीआरटीएस मार्गावरुन अखेर पीएमपीएमल बस धावली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

नऊ वर्षे रखडलेल्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएस मार्गावर आज (शुक्रवारी) पीएमपीएमल बस धावली. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखवून निगडीतून बीआरटी मार्गावर बससेवा सुरु झाली. यावेळी निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनलचे देखील उद्‌घाटन करण्यात आले. बीआरटी बस नियोजन सर्व पीएमपीएमएल व्यवस्थापनाकडे दिले असल्याने आज पासून त्यांचा ताण वाढणार आहे.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4662835f-a77a-11e8-a473-938ebd76954c’]

यावेळी उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, स्थानिक नगरसेवक उत्तम केंदळे, सचिन चिखले, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीएलच्या व्यस्थापकीय संचालिका व अध्यक्षा नयना गुंडे, सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंबासे, उपअभियंता विजय भोजने, दीपक पाटील, संजय काशिद, संजय साळी, बाळासाहेब शेटे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बीआरटीएस मार्गावरील बंदी न्यायालयाने उठविल्यानंतर आज (शुक्रवार)पासून मार्गावर बस सुरु केली आहे. दोन महिन्यानंतर न्यायालयाला अहवाल सादर करुन कायमस्वरुपी बस चालू करण्यात येणार आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4cdd729b-a77a-11e8-b34e-759230df3ca1′]

या मार्गावरुन २७३ बस धावणार आहेत. दिवसाला २२०० फे-या होणार आहेत. एका ते तीन मिनिटाला एक बस धावणार आहे. पुणे स्टेशन, मनपा भवन, हडपसर, शेवाळवाडी, वाघोली, कात्रज, अप्पर इंदिरानगर, कोथरुड डेपो, वारजे माळवाडी या मार्गावरील बस धावणार आहेत. पीएमपीच्या ११३ गाड्या, तर भाडेतत्त्वावरील १३९ गाड्या या मार्गावर नव्याने आणल्या असून, अन्य बीआरटी मार्गावरील २१ गाड्या अशा एकूण २७३ गाड्या या मार्गावर धावतील. सध्या या मार्गावरून धावणा-या काही जुन्या गाड्या अन्य मार्गांवर पाठविल्या जातील.

बीआरटीएस मार्गातून केवळ बीआरटीच्या बस, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या, मंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्याला परवानी देण्यात आली असून इतर वाहनांना परवानगी नाही. इतर वाहने या मार्गात शिरल्यास पोलिसांकडून दंडाची आकारणी केली जाणार आहे. पालिकेने दंडाची रक्कम ठरवून दिली आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’52715d7f-a77a-11e8-8c5e-fb6622031968′]

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या साडे चौदा किलो मीटर अंतरावर नऊ वर्षे २७ कोटी खर्च झाला आहे. बीआरटी मार्ग, बस थांबे या ठिकाणी वार्डन, सफाई कामगार याचा ठेका पीएमपीएमएल व्यवस्थापणाकडून एका ठेकेदारास दिला आहे.