रिसॉर्टवर पोलिसांचा छापा, ८ तरुणींसह ११ जण ताब्यात

तलासरी : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र गुजरात सीमेवर अच्छाड येथील ग्रीनपार्क रिसॉर्टमध्ये छापा टाकून पोलिसांनी अवैधरित्या सुरु असलेल्या डान्सबारवर कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी ८ बारबाला आणि ११ जण ताब्यात घेतले आहे.

तलासरी पोलिसांना ग्रीनपार्क रिसॉर्टमध्ये काही बारबाला आणि पुरुष रात्री उशिरापर्यंत संगितावर अश्लील नृत्य करत आहेत अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री रिसॉर्टवर छापा टाकला.

याप्रकरणी रिसॉर्ट व्यवस्थापक व या पार्टीचा आयोजक निपन सुरेशभाई शाह (रा. भिल्लाड) तसेच हसन शब्बीर खान (रा. काशीमीरा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तरुणी व पुरुषांवर भादंवि २९४, ११४, १०९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३, प्रमाणे अटक करून न्यायालयात हजर केले आहे. तेथे अवैधरित्या डान्सबार सुरु होता. अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. या रिसॉर्टमधून पोलिसांनी ४८ हजार रुपये १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.