The Poona Merchants Chamber | दि पूना मर्चंटस् चेंबर तर्फे ‘अनेकता मे एकता’ रॅलीचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – The Poona Merchants Chamber | यंदा देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे आज शनिवार दि. १३ ऑगस्ट २०२२ रोजी “अनेकता मे एकता” रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. “अनेकता मे एकता” चा संदेश देणारी विविध राज्यातील नागरिकांप्रमाणे वेशभूषा करुन चेंबरचे सभासद सहभागी झाले होते. भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये भारत मातेची वेशभूषा केलेल्या महिलेचा समावेश रॅलीमध्ये करण्यात आला होता. रॅलीची सुरुवात मार्केट यार्डातील गुळ भूसार विभागातील गेट क्र. ४ पासून करण्यात आली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया व कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांतजी गरड यांनी पुष्पहार अर्पण करुन समारोप केला. (The Poona Merchants Chamber)

 

 

यावेळी ‘भारत माता की जय’ व ‘वंदे मातरम’ च्या जयघोषाने मार्केट यार्ड परिसर दनाणून गेला. रॅलीतील सर्व घटकांमध्ये देशभक्ती व उत्साहाचे वातावरण दिसत होते. रॅलीमध्ये ‘शिवाज्ञा’ ढोलताशा पथक विशेष आकर्षण ठरले. (The Poona Merchants Chamber)

रॅलीमध्ये चेंबरचे सर्व माजी अध्यक्ष, सर्व व्यापारी, दलाल बंधू, हमाल, आडते, बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सर्व घटक सहभागी झाले होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण चोरबेले, आशिष दुगड, संदिप शहा, दिनेश मेहता,
महिपाल राजपुरोहित, नवीन गोयल, उत्तम बाठिया, हरिराम चौधरी, प्रकाश नहार आदिनी विशेष परिश्रम घेतले.
रॅलीत पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सभासद बंधू पारंपारिक वेश परिधान करुन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,
अशी माहिती दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बाठिया यांनी दिली.

 

Web Title :- The Poona Merchants Chamber | Organized ‘Anekta Me Ekta’ rally by The Poona Merchants Chamber

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | कैदी नंबर 8959 ! आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांची नवी ओळख, जाणून घ्या कसे काढत आहेत दिवस

 

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची नवी रणनीती ? पक्ष कार्यकारिणीने घेतला ‘हा’ निर्णय

 

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व पक्षातील आमदारांसाठी मोठी घोषणा