आश्चर्य ! डुकराचे हृदय माकडाच्या शरीरात

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – अवयव प्रत्यारोपणाच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. आमुक माणसाला किडनी किंवा लिव्हरचे प्रत्यारोपणही करण्यात आले आहे. इतकेच काय तर अलीकडच्या काळात हृदय तसेच मेंदूचेही यशस्वीरीत्या प्रत्यारोपण करण्यात आले आहे. हे झालं माणासचं. आपल्याला माहीतच आहे की, बेडूक तसेच उंदीर यांच्यावर अनेक प्रकारच्या शस्त्रक्रियांचे प्रयोग केले जातात. असाच प्राण्यांवरील एक प्रयोग करण्यात आलेला आहे ज्यात एका माकडाच्या शरीरात डुकराच्या हृदयाचे त्यारोपण केले आहे. विशेष म्हणजे हा प्रयाेगही यशस्वी झाला आहे.
सशोधनातून असे समोर आले आहे की, डुकराच्या शरीरातील अवयव आणि मानवी शरीरातील अवयव यामध्ये बरेच साम्य असते. संशोधकांचे असेही मानणे आहे की,  मानवी शरीरातही डुकराचे शरीरांतर्गत असलेले काही अवयव प्रत्यारोपित करता येऊ शकतात. ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून संशोधकांनी एक वेगळा प्रयाेग केला. संशोधकांनी एका माकडाच्या शरीरात डुकराच्या हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपण केले आहे.
एखाद्या निरोगी पशूच्या अवयवाचे दुसर्‍या पशूच्या शरीरात प्रत्यारोपण करण्याच्या या क्रियेला ‘एक्सेनाट्रांस्प्लांटेशन’ असे म्हटले जाते. ज्या माकडावर हा प्रयोग करण्यात आला ते बबून नावाच्या जातीचे माकड होते.  या माकडाच्या शरीरात हे हृदय प्रत्यारोपित केल्यानंतर ते तब्बल 195 दिवस म्हणजे सहा महिन्यांपेक्षाही अधिक काळ जिवंत राहिल्याचे समोर आले. . या प्रक्रियेमुळे गंभीर हृदयविकार असलेल्या रुग्णांना भविष्यात लाभ मिळू शकतो. यामुळेच हे संशोधन म्हणजे आता वैद्यकीय संशोधन क्षेत्रामध्ये मैलाचा दगड मानले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तसं पाहिलं तर जगभरात  लाखोंच्या संख्येने रुग्ण हृदयप्रत्यारोपणाची वाट पाहत असताना दिसत आहेत. विशेष म्हणजे 2030 पर्यंत एकट्या अमेरिकेतच हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या 80 लाखांपर्यंत पोहोचू शकते, असे अनुमान काढल्याचे समोर आले आहे.