धक्कादायक ! पतीनेच पत्नीचे ‘अश्लील’ फोटो व्हायरल केल्याने ‘खळबळ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येरवड्यातील नवी खडकीत राहणाऱ्यां पतीनेचे पत्नीच्या मॅनेजरला पत्नीचे बेडरुममधील अश्लिल फोटो पाठविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी पतीसह सासू, दिर, भावजय अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २६ मे ते २८ जून २०१९ दरम्यान घडली आहे. याप्रकरणी २५ वर्षाच्या विवाहितेने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, लग्नात व्यवस्थित मानपान दिला नाही. स्वयंपाक नीट येत नाही. तसेच पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. त्यासाठी माहेरहून पैसे आण असे सांगून विवाहितेला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. पतीने बेडरुममधील विवाहितेचे नग्न फोटो काढून हे फोटो विवाहितेचा मॅनेजरला पाठवून तिची इज्जत घालविण्याची धमकी देऊन विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

येरवडा पोलिसांनी पाच जणांवर विवाहितेचा छळ, विनयभंग अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like