राज्यात काँग्रेस थेट सत्तेत ‘सहभागी’ ?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – शिवसेनेने भाजपापासून फारकत घेण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी आज काँग्रेसच्या वरिष्ठांची बैठक होत असून प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे नवी दिल्लीत आले आहेत. शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याऐवजी काँग्रेसने थेट सत्तेत सहभागी व्हावे, अशी भूमिका काँग्रेसमधील तरुण आमदारांनी मांडली आहे.

जयपूरमध्ये एकत्रित ठेवण्यात आलेल्या आमदारांशी खर्गे यांनी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. यावेळी पलूसचे आमदार विश्वजित कदम यांनी भाजपाला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी जे जे करणे शक्य आहे. ते ते काँग्रेसने केले पाहिजे. बाहेरुन पाठिंबा देण्याऐवजी सत्तेत सहभागी झाले पाहिजे.

आमदारांचे हे मत खर्गे, बाळासाहेब थोरात हे सोनिया गांधी यांना सांगणार आहेत. सकाळी १० वाजता होणाऱ्या या बैठकीत सोनिया गांधी याचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे येथे सकाळी १० वाजता होणारी बैठक महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येण्याच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.

Visit : Policenama.com