NEET २०१८ चा निकाल CBSE द्वारे आज जाहीर करण्याची शक्यता

पोलीसनामा ऑनलाईन

काही दिवसांपूर्वी १२ वी चा निकाल जाहीर झाला असून पुढील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आता, १२ नंतर मेडिकलच्या प्रवेशासाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) परीक्षेचा निकाल सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) जाहीर करण्याची शक्यता आहे.

यावर्षी या परीक्षेला सुमारे 13 लाख विद्यार्थी बसले होते. या विद्यार्थ्यानी 6 मे रोजी NEET ची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या परीक्षेचा निकाल परीक्षार्थी सीबीएसईच्या cbseneet.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर विद्यार्थ्याना पाहायला मिळेल. याआधी सीबीएसईने 27 मे रोजी NEET 2018 ची ‘आन्सर की’ जाहीर केली होती. त्याचबरोबर, 27 मे पर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. तज्ज्ञांच्या मते, यंदा परीक्षा मुळातच कठीण होती, त्यामुळे कट ऑफ कमी होण्याची शक्यता आहे. परीक्षेत मिळवलेल्या गुणांवर परीक्षार्थींची ऑल इंडिया मेरिट लिस्ट ठरवली जाईल. सीबीएसई सर्व परीक्षार्थ्यांची वेगवेगळी रँकसुद्धा घोषित करेल.