भाजपची उमेदवारी जाहीर होताच ‘या’ 6 मतदार संघात बंडखोरीची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – युतीची घोषणा होण्याअगोदर युती होणार की नाही याबाबत तर्कवितर्क काढले जात होते. अखेर पत्रक काढून दोन्ही पक्षांनी युतीची घोषणा केली. युती झाली नाहीतर आपल्याला तिकीट मिळणार या आशेवर बसलेले इच्छूक नेत्यांनी युती झाल्यानंतर बंडाचे निशाण उपसले. युती झाल्यानंतर भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर नेत्यांनी बंडखोरी करण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसात बंडोबांना शांत केले नाही तर भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

गुहागर
गुहागर तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज घेतला असून खबरदारी म्हणून निवडणुकीचा अर्ज घेतल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली. वरिष्ठ पातळीवरून अद्याप कोणतीही सुचना न आल्याने गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू हे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विनय नातू यांच्या या भूमिकेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

कोथरुड (पुणे)
कोथरुड विधानसभेच्या निवडणुकीकेडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, याठिकाणी बाहेरचा नको स्थानिक हवा असा सूर मतदारांमधून निघत असल्याने चंद्रकांत पाटील यांच्यापुढील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर विद्यमान आमदार मेघा कुलकर्णी नाराज झाल्या आहेत. तर इच्छूक उमेदवार असलेले शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने ही जागा मित्र पक्षाला सोडली आहे.

कल्याण पश्चिम
कल्याण पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने या ठिकाणचे भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पाटील यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे नाराज पाटील हे वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असून त्यांची नाराजी दूर करणे भाजपसाठी आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

ठाणे
भाजपला ठाणे शहर मतदारसंघ दिल्यास शिवसैनिक भाजप उमेदवारासाठी काम करणार नाहीत असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. यावेळी शिवसैनिकांनी भाजपाविरोधात घोषणाबाजीही केली. त्यामुळे शिवसेनेचा गढ असलेल्या या भागात भाजपला प्रचारासाठी जागा देऊ नका असं शिवसेना कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

लोहा
लोहा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या मुलाला प्रविण चिखलीकर याला उमेदवारी देण्याच्या अटीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र लोहा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे गेल्याने तेथील उमेदवारही त्यांनी निश्चित केला आहे. त्यामुळे संतापलेल्या चिखलिकर यांनी शिवसेनेला धडा शिकविण्याची थेट धमकीच दिली आहे.

नागपूर दक्षिण
नागपूर दक्षिणमधून मोहन मेटे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने या ठिकाणी इच्छूक असलेले विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे. पक्षाने माझे तिकीट का कपाले याचे उत्तर द्यावे असे म्हणत कार्यकर्त्यांचा विचार घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे.

Visit : policenama.com