उद्योगपती मुकेश अंबानीच्या मुलाच्या प्री-एंगेजमेंट कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

उद्योग विश्वात नाव असलेल्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीची प्री-एंगेजमेंट सेरेमनीचा सोहळा संपन्न झाला. अंबानी कुटुंबाच्या या कार्यक्रमासाठी बॉलिवूडचे अनेक कलाकार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या पत्नीसह उपस्थित होता.

[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’62b0928a-7b71-11e8-a711-258b1e64545a’]

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांची काही दिवसात एंगेजमेंट होणार आहे, त्यापूर्वीच्या प्री-एंगेजमेंट कार्यक्रमासाठी बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आपली पत्नी गौरी खान यांच्यासह उपस्थित होता तसेच आलीय भट, रणबीर कपूर, प्रियंका चोपडा, दिग्दर्शक कारण जोहर, आणि अयान मुखर्जी यांनी ही या कार्यक्रमात उपस्थिती लावली.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा आकाश अंबानी हा मोठा मुलगा आहे, तर श्लोका मेहता ही प्रख्यात हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी आहे. श्लोका मेहता हिने आपले प्राथमिक शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मधून पूर्ण केले आहे. तर मानसशास्त्राच्या पदवीचे शिक्षण अमेरिकेतून घेतले आहे. त्याचबरोबर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून मास्टर्स डिग्री मिळवली आहे आणि त्याचबरोबर कायदाशास्त्राचे ही शिक्षण घेतले आहे. २०१४ मध्ये तिने ‘रोसी ब्लू फाउंडेशन’ च्या डायरेक्टर पदाची कामगिरी सांभाळली आहे, तसेच ती ‘कनेक्टफॉर’ या सामाजिक संस्थेची ‘को-फाउंडर’ होती.

काही दिवसांपूर्वी आकाश आणि श्लोका याच्या प्री-एंगेजमेंट कार्यक्रम २४ मार्च ला गोव्यात ही पार पडला होता. त्यावेळी फक्त मित्र आणि नातेवाईक यांची उपस्थिती होती. त्यांची एंगेजमेंट ३० जून ला होणार आहे. हा सोहळा गुजराती पद्धतीनुसार संपन्न होणार आहे. श्लोक आणि आकाश लहानपणापासूनचे मित्र होते.

image instagrammed by mickeycontractor


image instagrammed by mickeycontractor

image instagrammed by mickeycontractor