‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा बुधवारी पुण्यात 

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन-

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील जनसुनावणी  बुधवार दि. ११/०७/२०१८ रोजी महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था, फोटो झिंको जवळ, ३ चर्च रोड, पुणे  येथे होणार आहे. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर  उपस्थितीत असणार आहेत.  तसेच यावेळी करभारणी प्रशिक्षण अभियानाच्या उदघाटनाचा कार्यक्रम आणि येरवडा महिला कारागृहातील महिला कैद्यांसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन लोकार्पणाचा कार्यक्रम देखील पार पडणार आहे.
[amazon_link asins=’B07DHS8MY5′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’519db3c7-845b-11e8-be4d-9f37c54b4590′]

महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न  करत आहे. महिलांना न्याय मिळावा यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राज्यमहिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. यावेळी पोलीस प्रशासन, विधी सल्लागार,  समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार सुनावणीसाठी उपस्थित राहणं आर्थिकदृष्ट्या तसंच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. महिला आयोग आपल्या दारीअंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली कैफियतमांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचं काम आयोग याद्वारे करत आहे.  अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्या असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले आहे.
[amazon_link asins=’B01N7AEESB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’78825d91-845b-11e8-b09d-03f601b10db2′]