वरिष्ठ पाेलीस निरिक्षक विठ्ठल कुबडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर

पिंपरी : पाेलीसनामा ऑनलाईन

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाेलीसांना राष्ट्रपती पदकाची घाेषणा करण्यात अाली अाहे. यामध्ये पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरिक्षक विठ्ठल खंडुजी कुबडे यांना राष्ट्रपती पदक जाहिर झाले. ते १९९३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणुन सेवेत रूजू झाले. महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकॅडमी नाशिक येथील प्रशिक्षणानंतर पहिली पोस्टींग भंडारा येथील साकोली येथे झाली. त्यानंतर अतिनक्षल ग्रस्त भाग  गोरेगाव, सालेकसा, दरेकसा,अर्जुनी मोरगाव आदी नक्षल परिसरात त्यांनी काम केले. कुबडे यांची १५ आॅगस्ट २०१८ ला राष्ट्रपती पदकासाठी निवड झाली आहे.
[amazon_link asins=’B01951R2S2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f1bc5522-9fc7-11e8-8abd-77a2f048c79d’]

नक्षलवाद्यांशी दाेन हात
भंडारा येथे सन १९९४ ते २००० पर्यंत त्यांनी काम केले तेथे २ नक्षलवाद्यांशी चकमकी झाल्या हाेत्या, एका चकमकीत दोन नक्षलींना पकडले व दुसर्‍या चकमकीत चार नक्षलवादी मारले गेले. त्यानंतर परभणी येथे बदली. काही काळ काम केल्यानंतर नांदेड येथे ते रूजू झाले. तेथे २००० ते २००४ पर्यंत काम केले. त्याठिकाणी उसमाननगर,कुंडलवाडी येथे इन्चार्ज म्हणुन काम करण्याची संधी त्यांना मिळाली. उस्माननगर, कुंडलवाडी या पोलीस ठाण्यात चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. नांदेडहुन पदोन्नतीने २००४ मध्ये बुलढाणा येथे सहायक पोलीस निरिक्षक पदावर रूजू झाले. तेथे २००४ ते २००७ पर्यंत काम केले. त्या ठिकाणी नकली नोटा व हत्यारे पकडली. तेथेही चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर  २००७ ते २०१५ या कालावधित लातूर येथे काम केले. तेथेही त्यांना सन्मानित करण्यात आले.

तब्बल ८६९ रिवार्ड
२०१५ला पुण्यात पिंपरी येथे काम करण्याची संधी मिळाली. पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असताना गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केल्या. चिचंवड येथे गुन्हे तपासात विशेष कामगिरी केल्याबद्दल १३ वेळा पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आजपर्यतच्या कालावधीत कूबडे यांना  ८६९ रिवार्ड,  १.विशेष सेवा पदक, २.पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, ३.आंतरिक सुरक्षा पदक प्राप्त झाले.

विठ्ठल कुबडे म्हणाले, ‘आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक वरीष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य, आई,वडिल यांचे आशिर्वाद, पत्नी व मुला मुलींचे प्रोत्साहन यामुळेच हे यश संपादन करता आले. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.’