… म्हणूनच राज्यात राष्ट्रपती राजवट, काँग्रेसचा आरोप (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस केली. मात्र या नंतर काँग्रेसकडून भाजपवर कडाडून टीका करण्यात आली आहे. भाजपने या आधी देखील इतर राज्यांमध्ये राज्यपालांचा अशा प्रकारे वापर केला असल्याचे सांगत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे.

राज्यपाल हे भाजपाचे बाहुले आहेत का ? सत्तास्थापनेसाठी पुरेसे प्रयत्न न करता इतर पक्षांना पुरेसा वेळ न देता व राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला वेळ संपण्याची वाटही न पाहता जर त्यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. हे खरे असेल तर त्यांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी ठरेल अशी तिखट प्रतिक्रिया सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटरवरून व्यक्त केली आहे.

राज्यामध्ये भाजपा शिवाय सरकार स्थापन होत आहे हे पाहूनच राष्ट्रपती राजवटीची तयारी राज्यपालांनी भाजपाच्या दबावाखाली केली आहे. ‘जाहीर निषेध’ अशा शब्दात सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे.

राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिल्यावर राष्ट्रवादीने आमच्याकडे बहुमताचा आकडा नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर मात्र राज्यपालांनी लगेच केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवटी संदर्भात शिफारसी केली होती. त्यामुळे आता राज्यात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

Visit : Policenama.com