हिऱ्याची किंमत जास्त दाखवून २ हजार कोटी गेले परदेशात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

कच्चे हिरे आणून त्यावर पैलू पाडण्याचे काम मुंबई, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर चालते. हाँगकाँग, दुबईवरुन कच्चे हिरे आयात करताना त्याची व्यापाऱ्यांनी किंमत दाखविली होती १५६ कोटी रुपये, सुमार दर्जाच्या या हिऱ्यांची खरी किंमत होती अवघी १ कोटी २० लाख रुपये. या हिऱ्यांचा दर्जा तपासल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली असून त्याद्वारे किमान २ हजार कोटी रुपये परदेशात अधिकृतपणे पाठविण्यात आल्याचे महसूल गुप्तचर महासंचालनालयाने उघडकीस आणले आहे. याप्रकरणी चार जणांना अटकही केली आहे.

[amazon_link asins=’B072WZJ1XR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’789b2a1d-87e7-11e8-bc45-6161aaf3ce1f’]

कमी दर्जाच्या हिऱ्यांची किंमत जास्त दाखवून, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर, वांद्रे-कुर्ला संकुलातील बीडीबीच्या कार्यालयावर डीआरआयने छापे मारले होते. व्यापाऱ्यांनी १५६ कोटी रुपये किंमत दाखवून हा व्यवहार केला होता. प्रत्यक्षात अत्यंत सुमार दर्जाच्या या हिऱ्यांची किंमत अवघी १ कोटी २० लाख होती. या हिऱ्यांचा दर्जा तज्ञांकडून तपासल्यानंतर ही माहिती समोर आली. हाँगकाँग व दुबईसारख्या विदेशातून हे कच्चे हिरे आयात केले होते. त्यांची किंमत फुगवून केलेल्या व्यवहारातून २ हजार कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.

अटक करण्यात आलेल्या चार आरोपींकडून १० लाख रुपयांची रोख रक्कम, २ कोटी २० लाख रुपयांचे डिमांड ड्राफ्ट, चेकबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड जप्त करण्यात आले आहे. हिऱ्यांचा दर्जा तपासणाऱ्या काही सदस्यांना हाताशी धरून असे प्रकार केले जात असल्याचा अंदाज आहे.

हिरे व्यापाऱ्यांची संघटना असलेले जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काउन्सिल (जीजेईपीसी) ने  या घटनेचा निषेध केला आहे. आमच्या संघटनेचे सदस्य नसलेल्या काही जणांच्या गटाकडून जेम्स व ज्वेलरी उत्पादनांचा वापर करून, मनी लॉन्ड्रिंग केले जात असल्याची घटना दुदैर्वी आहे. या व्यवसायावर ६ हजारांपेक्षा अधिक व्यापारी व ५० लाखांपेक्षा अधिक व्यक्ती अवलंबून आहेत.

 हाँगकाँग येथून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या संशयास्पद आयातीबाबत आम्ही सरकारला वेळोवेळी माहिती दिली असून, आमचे सदस्य जागल्याची भूमिका बजावत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. सरकारने केवळ जीजेईपीसीला हिऱ्यांचा दर्जा ठरविण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी सरकारकडे करण्याची गरज निर्माण झाल्याचे मत संघटनेने व्यक्त केले आहे.
[amazon_link asins=’B07F91D8XN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d2aba720-87e7-11e8-a930-2390d9e115e2′]