आनंदवार्ता ! १००० हून अधिक ‘औषध – गोळ्या’ होणार स्वस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सामान्य माणसांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. उपचार आणि औषधांचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी सरकारने जवळपास एक हजार औषधांच्या किमतींमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने १ हजार ३२ औषधांच्या किमती निश्चित केल्या आहेत. यामुळे औषध कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आळा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरीब आणि सामान्य रुग्णांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर जनऔषधी स्टोअर्सना ७०० विविध प्रकारची औषधेही पुरवली जाणार आहेत.

हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दीर्घ आजारांवरील वैद्यकीय खर्चात वाढ झाल्याने त्याचा भार कुटुंबावर पडतो. अनेकदा अख्खे कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे सामान्य रुग्णांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार विविध पाऊले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेतला आहे. किंमत कमी केल्यामुळे यातील मार्जिन देखील घटणार असल्याने आणि ते निश्चित असल्याने याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. यामुळे सतत औषधांचे सेवन करणाऱ्या रुग्णाला याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे.

दरम्यान, काल शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील संसदेत औषधांच्या किमती कमी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

निरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश 

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’ 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like