बाप्पांच्या स्वागतासाठी पहिल्यांदाच येरवडा कारगृहातील कैद्यांचे ‘ढोल पथक’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दोन वर्षापूर्वी म्हणजेच 2017 मध्ये कैदी बँड नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी बँड तयार करून मोठी स्पर्धा जिंकल्याचे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. कैद्यांच्या कलेला वाव देणाऱ्या या चित्रपटातील प्रसंग आता पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात प्रत्यक्षात उतरला आहे. येरवडा कारागृहातील कैद्यांनी केलेल्या ढोल पथकाच्या गजरात बाप्पाचे स्वागत करण्यात येणार आहे. कैद्यांच्या या पथकामध्ये 22 ते 26 कैद्यांचा समावेश असणार आहे.

कैद्यांसाठी कारागृह प्रशासनाकडून अनेक सामाजिक आणि सांस्कृतीक उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांतर्गत यावेळी कैद्यांच्या ढोल-ताशा पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. येरवडा कारागृहामध्ये दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी कारागृहातील बाप्पाची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीत कैद्यांचे पथक सहभागी होणार आहे. या कैद्यांना वाद्याचे प्रशिक्षण नादब्रम्ह पथकाचे अध्यक्ष अतुल बेहेरे यांनी दिले आहे. कैद्यांचे हे पथक पुण्यातील मानाच्या गणपती पैकी तिसरा गुरुजी तालीम गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी होणार आहे.

या संदर्भात येरवडा कारागृह अधीक्षक यू. टी. पवार यांनी सांगितले की, या गणेशोत्सवात प्रथमच कैद्यांचे ढोल पथक सहभागी होणार आहे. या पथकामध्ये 22 ते 26 कैद्यांचा समावेश आहे. हे पथक लक्ष्मी रोडवर बाप्पांचे स्वागत करताना दिसणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –