प्रो-कबड्डी लीगच्या वेळापत्रकात पुन्हा बदल

मुंबई: पोलीसनामा आॅनलाइन

प्रो-कबड्डी लीगच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. प्रो कबड्डीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सहाव्या सत्राची नवीन तारीख पोस्ट करण्यात आली. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6c8ee1c4-bb49-11e8-814c-1daf51d5ff28′]

प्रो कबड्डीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार,  ही  स्पर्धा आता ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आधीच्या तारखेनुसार ही लीग ५  ऑक्टोबरला सुरू होणार होती.  या बदललेल्या तारखेमुळे पुढील सर्व वेळापत्रक बदलणार आहे, मात्र त्याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. प्रो कबड्डी लीगच्या तारखेत बदल होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी पुण्यातील लीग सामन्यांत बदल करण्यात आला होता. पुण्यातील लीग सामने १९ ऑक्टोबर ऐवजी १८ ऑक्टोबरला खेळवण्याचा निर्णय घेतण्यात आला होता.

संजय बर्वे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्‍ती 

सततच्या या बदलांमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रो कबड्डी लीग ही अतिशय प्रतिष्ठित , व्यावसायिक कबड्डी लीग आहे. २६ जुलै, इ.स. २०१४ रोजी सुरु झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात  जगभरातील खेळाडूंसह ८ संघ सहभागी झाले होते .

You might also like