मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 9 ऑगस्टला ठिय्या आंदोलन 

 पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी विविध जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले जाणार आहे. अशी माहिती मराठा क्रांती मूक मोर्चाचे समनव्यक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
[amazon_link asins=’B002U1ZBG0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8a31875d-9a46-11e8-b70b-a918bbba3879′]

यावेळी कोंढरे म्हणाले की, मराठा समाजाच्या मागणीसाठी दोन वर्षांपासून लढा देत आहोत. या मागणीसाठी अनेक तरुणांनी बलिदान देखील दिले असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आज राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात प्रगती अहवाल मुंबई हायकोर्टात सादर केला. तर यावेळी मागास आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत येणे अपेक्षित असल्याचे सरकारने कोर्टाला सांगितले असून कोर्टाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मराठा समाजाने धीर धरावा आंदोलन करु नये.असे आवाहन देखील न्यायालयाने केले आहे.

या सर्व निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र याला गती प्राप्त व्हावी ही समाजाची अपेक्षा आहे. सर्व घडामोडी लक्षात घेता. येत्या 9 ऑगस्ट चे नियोजित आंदोलन प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर केले जाणार आहे. कोणत्याही प्रकारचा कायदा हातांमध्ये घेतला जाणार नाही. मराठा समाजतील कोणत्याही व्यक्तीने आत्महत्या करू नये. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
[amazon_link asins=’B00KNOW2SQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’939edc6d-9a46-11e8-8a3b-b1ee444871d6′]

या पत्रकार परिषदेस तुषार काकडे, धनंजय जाधव, उषा पाटील, स्वाती पवार, सचिन आडेकर हे पदाधिकारी उपस्थित होते.