पुण्यातील पुरग्रस्तांना अद्याप मदत नाही, तहसीलदारांनी इलेक्शनचे कारण देत झटले हात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. या घटनेला १२ दिवस उलटून गेले तरी अद्याप पंचनामे झाले नाही. त्यामुळे पुरात नुकसान झालेले अनेक कुटुंब हवालदिल झाले आहे. तहसीलदार कार्यालयाने तावरे कॉलनी येथील पुरग्रस्तांचा अर्धवट सर्वे केला आहे. याठिकाणी अजूनही १०० कुटुंबांचा सर्वे होणे शिल्लक असताना तहसीलदार कोलते पाटील हे इलेक्शन ड्युटी असल्याचे सांगत हात झटकत असल्याने संतप्त नागरिकांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तावरे कॉलनीतील अनेक कुटुंबातील संसारउपयोगी सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने पुरग्रस्तांना मदत देण्यासाठी संबंधीतांना पंचनामे करण्यास सांगितले होते. मात्र, तहसीलदार कार्यालयाने अर्धवट सर्वे केला असून अद्याप १०० घरांचा सर्वे शिल्लक आहे. या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सहा दिवसांपूर्वी नागरिकांनी या ठिकाणी पंचनामा फॉर्म दिले आणि काहीजणांचे फॉर्म भरून घेतले.

नागरिकांनी तहसीलदार कोलते पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आम्ही फॉर्म घेणार नसल्याचे सांगितले. तसेच आम्हाला इलेक्शन ड्युटी असल्याचे सांगत पुरग्रस्तांचे फॉर्म घेण्यास नकार दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. १२ दिवस उलटूनही अद्याप पुरग्रस्त नागरिकांना कोणत्याही प्रकराची मदत मिळाली नाही. त्यातच बुधवारी (दि. 9) पुन्हा मुसळधार पाऊस पडल्याने पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले. जर मदत मिळाली नाही तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच पवित्रा या ठिकाणच्या नागरिकांनी बैठकीत घेतला आहे. यावेळी ज्ञानेश्वर खर्डेकर , झानोबा पडवळ, अंकुश गावडे, मुबारक खान, गुरुदास पवार, फुलाबाई बाबर, योगेश गावडे, मनीषा कसबे, रुक्मिणी मोहिते नागरिक उपस्थित होते.

visit : policenama.com