×
Homeताज्या बातम्यापुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तास वाहतूक बंद 

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तास वाहतूक बंद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर पुण्याच्या दिशेकडील लेनवर ओव्हरहेड गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे आज शुक्रवारी पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी 12  ते 2 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

या कामासाठी दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान या मार्गावरील वाहतूक शेडुंग फाटा इथून जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर वळवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी शेडुंग फाटा, आजिवली चौक, दांड फाटा चौक, कर्जत फाटा आणि खालापूर फाटा येथून खालापूरमार्गे परत खालापूर टोलप्लाझा इथून पुण्याकडे जावे, अस महामार्ग पोलिसांनी कळवले आहे. या कालावधीत अवजड वाहनांना द्रुतगती मार्गावरील चिखले ब्रिजपासून मागे थांबवण्यात येणार आहे.

Must Read
Related News