इंदापूरातील जनावराच्या अवैध कत्तलखाण्यांचा प्रश्न ऐरणीवर

इंदापूर : प्रतिनिधी (सुधाकर बोराटे) –   जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने व जणावरे वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना महिंद्रा पिकअप गाडीतुन जर्सी गायींची वाहतुक करणार्‍या वाहनासह चार गायी इंदापूर पोलीसांनी पकडल्या असुन त्यांची वाहतुक करणारे दोन वाहन चालक यांना जनावरासह ताब्यात घेवुन त्यांचेवर इंदापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती इंदापुर पोलीसांकडून देण्यात आली आहे.

शनिवार दि.27 रोजी सायंकाळी 4:30 वा.चे सुमारास महिंद्रा पिकअप गाडी नं. एम.एच.12, पी.क्यु.2484 या गाडीतुन पूणे सोलापूर हायवेवरून जनावरांची वाहतुक होत असल्याची खबर इंदापूर पोलीसांना मीळाल्याने सदर गाडीचा पाठलाग करून मौजे शहापाटी गावचे हद्दीत पूणे सोलापूर रोडवर गाडी थांबवुन चौकशी केली असता पीकअपमध्ये चार मोठ्या जर्सी गायी आढळून आल्या. गाडीचालक समीर शब्बीर कुरेशी रा.टेंभुर्णी नाका इंदापूर,जि.पूणे व साहिल शफिक कुरेशी रा.अकलुज नाका इंदापूर,जि.पूणे.यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी अगोदर उडवा उडवीची उत्तरे दीली.

आरोपींना ताब्यात घेवुन चौकशी केली असता गायी ह्या कत्तल करण्याच्या उद्देशाने,त्यांना चारापाणी न देता पीकअपमधून घेउन जात असल्याची माहीती समोर आली असुन इंदापूर पोलीसांनी दोन आरोपींना चार गायी व वाहनासह ताब्यात घेवुन वरील आरोपीविरूद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 कलम 5,6,9 व पशु क्रुरता अधिनियम 1960 चे कलम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर याबाबतची फिर्याद विनोद उद्धव काळे.पो.काँ. इंदापूर पो.स्टेशन यांनी इंदापूर पोलीसात दीली असुन ही कारवाई सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशिल लोंढे यांचे पथकाने केली आहे.

गेल्या 10 दिवसातील इंदापूर पोलीसांची दुसरी कारवाई.

गेल्या दहा दिवसात इंदापूर पोलीसांची ही दुसरी कारवाई आहे गूरूवार दि.18 जुन 2020 रोजी इंदापूर येथील सावतामाळीनगर नागझरी मळ्यामध्ये अज्ञात इसमाने दोन मोठ्या जर्सी गायी, दोन कालवडी व दोन जर्सी खोंड अशी सहा जणावरे काटवानात कत्तली करण्याच्या उद्देशाने त्यांना चारापाणी न देता डांबुन ठेवले असल्याची गुप्त बातमी वरून सदर गायी ताब्यात घेवुन अज्ञात इसमा विरूद्ध इंदापूर पोलीसांनी गुन्हा दाखल करून गायींची सुटका केली होती.

तर मागील दोन महिण्यापूर्वी बारामती गुन्हे शाखा पथकाने इंदापूरातील अवैध कत्तलखाण्यावर छापा मारून सव्वा तीन टन गोमांस, सहा मोठी वाहणे व 18 आरोपीसह साडे चौदा लाखाच्या मुद्देमालासह कारवाई केली होती.तरीही इंदापूर शहरातील अवैध कत्तलखाने बंद होण्याचे नाव घेत नाहीत.तर दोन महिण्यातील ही तीसरी कारवाई करण्यात आल्याने इंदापूर शहर व परीसरात अवैध कत्तलखाने चालकांविरूद्ध असंतोष पसरत असुन शहरातील अवैध कत्तलखाने कायमचे बंद करण्याची मागणी वारंवार जोर धरत आहे परंतु संबधीत नगरपरिषद प्रशासन मुग गीळुन गप्प आहे.तर राजकीय हीतसंबधामुळे सत्ताधारी व विरोधक गप्प असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा असुन इंदापूर शहरातील अवैध कत्तलखाने ताक्ताळ बंद करण्याची मागनी स्थानिक नागरीक करत आहेत.