सोनू सूदनं हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध करताच सुरू झाले कॉल आणि मेसेजेसचा पाऊस ! व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला – ‘माफ करा’

पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूड स्टार सोनू सूद सध्या प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मदत करत आहे. त्याच्यामुळं अनेकजण सध्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत टाईम स्पेंड करत आहेत. सोनू या मजुरांची मदत एखाद्या देवदूताप्रमाणे करत आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना एका ट्विटवर किंवा मेसेजवर त्यांच्या घरी सोडत आहे. सोनू सूदनं आता मजुरांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध केला आहे. जसा सोनूनं हा नंबर प्रसिद्ध केला. त्याला लगेचच अनेकांचे कॉल आणि मेसेज यायला सुरुवात झाली. याबद्दल सोनूनं व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात दिसत आहे की, किती स्पीडनं त्याला लोकांचे फोन आणि मेसेज येत आहे. कोणापर्यंत जर मदत पोहोचू शकली नसेल तर मला माफ करा असंही त्यानं म्हटलं आहे.

सोनूनं ट्विटरवरून एक ट्विट शेअर केलं आहे. यात एक व्हिडीओ आहे. व्हिडीओत दिसत आहे की, सेकंदाला त्याला शेकडो फोन आणि मेसेज येत आहे. ज्यांना आपल्या घरी जायचं आहे असे लोक त्याला संपर्क साधत आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यानं म्हटलं आहे की, कोणापर्यंत जर मदत पोहोचू शकली नसेल तर मला माफ करा.

व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये सोनू म्हणतो की, “तुमचे मेसेज मला या स्पीडनं मिळत आहेत. मी माझी टीम प्रयत्न करत आहे की, प्रत्येकापर्यंत मदत पोहोचेल. जर यात आमच्याकडून काही मेसेजेस मिस झाले तर त्यासाठी मला माफ करा.” शेवटी त्यानं दोन्ही हात जोडलेली एक इमोजीही शेअर केली आहे.

सोनूनं हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध करताना ट्विटरवर एक इमेज शेअर केली आहे. यावर लिहलंय की, “माझ्या प्रिय मजुर बंधू आणि भगिणींनो. जर तुम्ही मुंबईत आहात आणि तुम्हाला घरी जायचं आहे. तर कृपया या नंबरवर कॉल करा- 18001213711. तुम्ही तुमचं नाव आणि पत्ता व्हॉट्सअ‍ॅपदेखील करू शकता. नंबर आहे- 9321472118. सोबतच ही माहिती नक्की द्या की, तुम्ही किती लोक आहात आणि तुम्हाला कुठे जायचं आहे. मला आणि माझ्या टीमला जी मदत करणं शक्य आहे आम्ही नक्की करू. आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल.”