देशातील 64 टक्के महिला खूष असल्याचा RSS सोबत संलग्न असलेल्या महिला संघटनेचा ‘दावा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला आघाडी असलेल्या राष्ट्र सेविका समितीने एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणामध्ये समितीने देशातील 64 टक्के महिला खूष असल्याचा दावा केला आहे. सर्वेक्षणाचा अहवाल मंगळवारी (दि. 24) राजधानी दिल्ली येथे जाहीर करण्यात येणार आहे. महिलांच्या स्थितीबाबतचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठे सर्वेक्षण असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी थॉमसन रॉयटर्सने भारतातील महिलांबाबत सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामध्ये महिलांच्या बाबतीत सर्वात धोकादायक देशापैकी भारत हे एक मानले होते. या सर्वेक्षणामध्ये 2007 ते 2016 या दरम्यानची आकडेवारी देण्यात आली. त्या आकडेवारीनुसार या वर्षांमध्ये महिलांच्या गुन्हेगारीमध्ये 83 टक्क्यांनी वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले होते.

574 जिल्ह्यात सर्वेक्षण
राष्ट्र सेविका समितीने देशातील 574 जिल्ह्यामधील महिलांचा सर्वे केला आहे. हा सर्वे दोन वर्षापासून सुरु होता. राष्ट्रीय सेविका समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीता आनंदनम म्हणाल्या, आम्ही हे सर्वेक्षण देशातील अनेक जिल्ह्यात केले आहे. जिल्ह्यातील महिलांच्या वेगवेगळ्या समस्या जाणून घेण्यात आल्या. त्यांचे प्रश्न जाणून घेण्यात आले. यामध्ये 64 महिला खूष आसल्याचे उघड झाले आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी विहिंप, विद्या भारती, एबीव्हीपी आणि इतर संस्थांची मदत घेण्यात आली.

Visit – policenama.com 

You might also like