…म्हणून आजच्या दिवशी एप्रिल फूलची प्रथा सुरु झाली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – १ एप्रिल म्हणजे एकमेकांना मुर्ख बनविण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र ‘एप्रिल फूल’ हा दिवस १ एप्रिललाच का साजरा केला जातो ? याबद्दलची माहिती तुम्हाला आहे का ?

एप्रिल फूलची कहाणी
१५८२ मध्ये पोप तेरावे ग्रेगरी यांनी ज्युलिअन दिनदर्शिका बदलून ग्रेगरिअन दिनदर्शिका आणली. या नव्या दिनदर्शिकेनुसार आता सगळ्यांनी १ एप्रिल ऐवजी १ जानेवारीला नववर्ष साजरं करावं असा रातोरात आदेश काढण्यात आला. साहजिकच अनेकांना ते काही रुचलं नाही. त्यामुळे लोकांनी याला कडाडून विरोध केलाच, आंदोलन वगैरे झाली ती वेगळीच. पण हळूहळू लोकांना मात्र तो निर्णय मान्य करावाच लागला, पण काही असेही लोक होते ज्यांनी मात्र १ जानेवारीला नववर्ष साजरं करण्यास ठाम नकार दिलाचय आम्ही १ एप्रिललाच नववर्ष साजरं करू या निर्णयावर ते ठाम राहिले. त्यामुळे या सगळ्यांनाचा मुर्ख ठरवण्यात आले. तेव्हापासून १ एप्रिल हा दिवस मुर्खाचा दिवस म्हणजे ‘एप्रिल फुल’ डे साजरा करण्यात येऊ लागला. फ्रान्समधली ही गोष्ट युरोपभर पसरली आणि त्यानंतर ‘एप्रिल फुल’ साजरा करण्यात येऊ लागला अशीही ही गोष्ट सांगितली जाते.

‘एप्रिल फूल’ विषयी दुसरी कथाही प्रचलित आहे. कॉन्सन्टाइन द ग्रेट याच्या काळात काही विदूषक राजदरबारात गेले. आपण या राजापेक्षाही चांगला कारभार करू शकतो असे त्यांचे मत पडले. आता उदार राजांनी एक दिवसासाठी गंमत म्हणून त्यातल्या एका विदूषकाच्या हाती राज्यकारभार सोपवला, तर एका विदूषकाने फर्मानच काढले. वर्षातला एक दिवस सगळ्या जनतेने मुर्खासारखे वागायचे आणि विदूषकासारखे चाळे करायचे. विदूषकाचा हेतू एवढाच की इतरांना हसवणं किती कठीण असतं हे लोकांना दाखवून द्यावं आणि तेव्हा पासून ‘फुल डे’ साजरा करण्याची जणू परंपराच सुरु झाली.

१३ व्या शतकात इंग्लंडचा राजा रिचर्ड सेकंड व बोहेमियाची राजकुमारी यांचा साखरपुडा ठरला व त्याची तारीख ३२ मार्च १३८१ अशी जाहीर केली गेली. लोकांनीही या तारखेवर विश्वास ठेवला पण मार्चमध्ये ३२ ही तारीखच नाही हे कुणाच्याच लक्षात आले नाही. म्हणजेच एक प्रकारे ते मूर्ख ठरले. व ३२ मार्च म्हणजे १ एप्रिल असा ही अर्थ त्यातून काढला गेला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like