रिझर्व्ह बँकेकडून शंभराची नवी नोट जारी 

नवी दिल्ली : पोलीसनामा  ऑनलाईन
भारतीय रिजर्व बँकेकडून १०० रुपयांची नवीन नोट चलनात येणार अशी चर्चा  होती मात्र ,आज रिजर्व बँकेकडून १०० रुपयांची  नवी नोट जारी करण्यात आली आहे. आता २००,५०,रुपयांच्या नोटांनंतर १०० रुपयांची देखील नवीन नोट  रिझर्व्ह बँकेने जारी केली आहे .

अशी असेल नवी शंभराची नोट

ही नोट जांभळ्या रंगात असणार आहे. यावर जागतिक वारसास्थळात समावेश असलेल्या गुजरातमधील ऐतिहासिक राणीच्या विहिरीचे चित्र असणार आहे. नवी १०० रुपयांची नोट चलनात आल्यानंतर जुनी नोट चलनात राहणार आहे. नव्या नोटेचे डिझाईन म्हैसूरमधील मुद्रणालयात पाठवण्यात आले आहे. याच ठिकाणी दोन हजार रुपयांच्या नोटांची छापाई करण्यात आली होती.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0fbc5009-8b3f-11e8-9ad1-f7976aac52e1′]

सध्याच्या १०० रुपयांच्या नोटेपेक्षा नवी नोट लहान असणार आहे. तर १० रुपयांच्या नोटेपेक्षा मोठी असणार आहे. ही नोट ऑगस्टच्या शेवटी बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप याबाबत रिझर्व्ह बँकेकडून कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती.  सुमात्रा एका अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहीनुसार रिझर्व्ह बँकेकडून ही नोट जारी करण्यात आली आहे.

नोटाबंदी केल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून सुरुवातीला दोन हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. त्यानंतर १०, ५०, २००, ५०० आणि दोन हजार रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता १०० रुपयांचीही नवी नोट लवकरच चलनात येणार आहे.