RBI लवकरच जारी करणार २० रुपयाचे नाणे ; ‘ही’ असणार नाण्याची खासियत 

( प्रतीकात्मक फोटो ) 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०००, १००, ५००, ५० च्या नव्या नोटा बाजारात आणल्यानंतर आता RBI 20 रुपयाचे नाणे बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. १० रुपयांच्या नाण्याप्रमाणे आता २० रुपयांचे नाणे देखील पहायला मिळणार आहे. मागच्या बुधवारी सरकारने २० रुपयाचे नाणे बाजारात आणण्याची घोषणा केली. वित्त मंत्रालयाने देखील याबाबत नोटिफिकेशन जारी केले आहे. या नव्या २० रुपयाच्या नाण्यात खूप विशेष गोष्टी असणार आहेत.

१० वर्षांपूर्वी मार्च २००९ साली RBI ने (रिजर्व बँक ऑफ इंडिया) ने १० रुपयाचे नाणे जरी केले होते. तेव्हा १३ वेळा या नाण्याची डिझाईन बदलण्यात आली होती. त्यामुळे सर्वसामन्य नागरिकांमध्ये संभ्रमावस्था होती. मध्यंतरी १० रुपयांचे नाणे नकली समजून त्याला नकार देखील देण्यात येत होता. यासंदर्भातले नोटिफिकेशन RBI ने मागील वर्षी जारी केले होते. ज्यात १४ प्रकारच्या नाण्यांची वैधता म्हणजेच लीगल टेंडर जारी करण्याबाबत सांगण्यात आले होते. नोटांपेक्षा नाणी अधिककाळ टिकतात. त्यामुळे नाणी नोटांपेक्षा अधिक काळ चलनात राहतात.

काय आहे २० रुपयाच्या नाण्याची खासियत 
– हे नाणे २७ एमएम आकाराचे असेल.
– त्याच्या किनाऱ्यावर कोणतेच चिन्ह असणार नाही.
– या नाण्याची बाहेरील कडा ६५% कॉपर, १५% झिंक आणि २०% निकेल धातूंचा असेल.
– या नाण्याची आतील कडा ७५% कॉपर, २०% झिंक आणि ५% निकेल या धातूंनी बनलेली असेल.