‘त्या’ शिक्षकाचा खून झाल्याचे निष्पन्न

आळेफाटा (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – आणे घाटात मृतावस्थेत आढळलेल्या संगीत शिक्षकाचा खुन झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आळेफाटा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता एकाला एक दिवसाची पोलीस कोठडी तर दुसऱ्या आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

मंगेश प्रकाश कुलकर्णी (वय-३२) असे खून झालेल्या संगीत शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणात मयूर गुंजाळ आणि सचिन हांडे या दोघांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे.

मंगेश कुलकर्णी यांचा सोमवारी (दि.११) आणे घाटात मृतदेह आढळून आला होता. याबाबत अर्जुन वसंतराव कुलकर्णी यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने मंगेश घराबाहेर पडले होते. त्यानंतर मंगळवारी (दि.१२) त्यांचा मृतदेह आणे घाटात आढळून आला. मात्र, मंगेश यांचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह त्यांच्या दुचाकीसह आणे घाटात टाकल्याचे अर्जुन कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादेत म्हटले आहे. पुढील तपास आळेफाटा पोलीस करीत आहेत.

Loading...
You might also like