MHT-CET च्या निकालाची तारीख जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी आणि कृषी अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षाच्यावतीने घेण्यात आलेल्या MHT-CET चा निकाल मंगळवारी (दि.३) लागणार नाही. उद्या सायंकाळी पाच वाजता निकाल जाहीर होणार आहे. www.mahacet.org या अधिकृत बेवसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. यंदा या परिक्षेला ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थी बसले होते.

सीईटीचा निकाल सोमवारी (दि.३) लागेल असे सांगण्यात आले होते. मात्र, आता उद्या निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. २ मे आणि १३ मे रोजी ही पऱिक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी जन्मतारीख, रोल नंबर ही आवश्यक माहिती विद्यार्थ्यांना जवळ बाळगणे आवश्यक आहे.

या परिक्षेत पात्र झालेले विद्यार्थ्यी पुढे काऊन्सेलिंग सेशनसाठी पात्र असतील. त्याचबरोबर मिळालेल्या रॅंकनुसार, विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीच्या फेऱ्यांसाठी ते पात्र ठरतील त्यानंतर त्यांचा प्रवेश निश्चत होईल, असे राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like